• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup Prize Money : ऑस्ट्रेलियाला 12 कोटी, न्यूझीलंडही मालामाल, टीम इंडियाला किती पैसे मिळाले?

T20 World Cup Prize Money : ऑस्ट्रेलियाला 12 कोटी, न्यूझीलंडही मालामाल, टीम इंडियाला किती पैसे मिळाले?

रविवारी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup Final) फायनलमध्ये टीम इंडियाला नवा चॅम्पियन मिळाला. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला (Australia vs New Zealand) धूळ चारत पहिला टी-20 वर्ल्ड कप आपल्या नावावर केला. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या टीमवर बक्षिसांचा वर्षाव (Prize Money) करण्यात आला.

 • Share this:
  दुबई, 15 नोव्हेंबर : रविवारी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup Final) फायनलमध्ये टीम इंडियाला नवा चॅम्पियन मिळाला. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला (Australia vs New Zealand) धूळ चारत पहिला टी-20 वर्ल्ड कप आपल्या नावावर केला. 2015 वनडे वर्ल्ड कपनंतर ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. या सामन्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 173 रनचं आव्हान दिलं होतं. मिचेल मार्शच्या (Mitchell Marsh) नाबाद 77 रन आणि वॉर्नरच्या (David Warner) 53 रनच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 7 बॉल शिल्लक असतानाच पार केलं. मार्श आणि वॉर्नर यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 59 बॉलमध्ये 92 रनची पार्टनरशीप झाली. या पार्टनरशीपमुळे ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये एकतर्फी विजय मिळवला. मार्शने 77 रनच्या खेळीमध्ये 6 फोर आणि 4 सिक्स मारले. तर वॉर्नरने 53 रनच्या खेळीमध्ये 3 सिक्स आणि 4 फोर लगावले. मार्शने यानंतर तिसऱ्या विकेटसाठी ग्लेन मॅक्सवेलसोबत (Glenn Maxwell) नाबाद 66 रनची पार्टनरशीप केली. ऑस्ट्रेलियाकडून जॉश हेजलवूडने 17 रन देऊन 3 विकेट मिळवल्या. आपला पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाला विजयी टीम म्हणून 1.6 मिलियन युएस डॉलर म्हणजेच 12 कोटी रुपये मिळाले. तर उपविजेत्या ठरलेल्या न्यूझीलंडला 8 लाख युएस डॉलर म्हणजेच जवळपास 6 कोटी रुपये देण्यात आले. सेमी फायनलमध्ये पोहोचलेल्या पाकिस्तान आणि इंग्लंडला प्रत्येकी 3-3 कोटी रुपयांचं बक्षीस मिळालं. भारतीय टीमला इनाम म्हणून 52 लाख रुपये मिळाले. विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक झाली होती. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धचा सामना गमावल्यानंतर भारताने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाचा पराभव केला होता. पहिल्या दोन सामन्यांमध्ये झालेल्या पराभवामुळे भारताला सेमी फायनल गाठता आली नव्हती.
  Published by:Shreyas
  First published: