• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup : पाकिस्तानची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी, नामिबियाला हरवून सेमी फायनलमध्ये धडक

T20 World Cup : पाकिस्तानची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी, नामिबियाला हरवून सेमी फायनलमध्ये धडक

पाकिस्तान टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सेमी फायनलमध्ये (Semi Final) पोहोचणारी दुसरी टीम ठरली आहे. याआधी इंग्लंडने पहिल्या ग्रुपमधून सेमी फायनलमध्ये स्थान मिळवलं आहे.

 • Share this:
  अबु धाबी, 2 नोव्हेंबर : पाकिस्तान टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सेमी फायनलमध्ये पोहोचणारी दुसरी टीम ठरली आहे. याआधी इंग्लंडने पहिल्या ग्रुपमधून सेमी फायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. पाकिस्ताने नामिबियाचा (Pakistan vs Namibia) 45 रनने पराभव केला. पाकिस्तानचा हा लागोपाठ चौथा विजय आहे. या सामन्यात पहिले बॅटिंग करत पाकिस्तानने 2 विकेट गमावून 189 रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना नामिबियाला 5 विकेट गमावून 144 रनच करता आले. पाकिस्तानने रेकॉर्ड पाचव्यांदा सेमी फायनलमध्ये स्थान पटकावलं आहे. श्रीलंका आणि वेस्ट इंडिजने प्रत्येकी 4-4 वेळा सेमी फायनल खेळली आहे. नामिबियाविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) अर्धशतकं केली. पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना नामिबियाला दुसऱ्या ओव्हरमध्येच धक्का लागला. वॅन लिंगेन 4 रनवर आऊट झाला. हसन अलीने त्याला बोल्ड केलं. स्टीफन बार्डने 29 आणि क्रेग विलियम्सने 40 रन करत नामिबियाच्या आशा जिवंत ठेवल्या, पण दोघांनाही मोठी खेळी करण्यात अपयश आलं. डेव्हिड वीजने नाबाद 43 रनची खेळी केली, पण टीम अपयशी ठरली. पाकिस्तानची टीम पहिल्यांदाच स्पर्धेत पहिले बॅटिंग करून सामना जिंकली आहे. याआधीचे तिन्ही सामने त्यांनी आव्हानाचा पाठलाग करून जिंकले होते. बाबर आझमने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. मोहम्मद रिझवानने 50 बॉलमध्ये नाबाद 79 रन केले, यामध्ये 4 सिक्स आणि 8 फोर मारले. बाबर आझम 70 रन करून आऊट झाला. बाबर आणि रिझवान यांच्यात 113 रनची ओपनिंग पार्टनरशीप झाली. बाबरच्या 49 बॉलच्या खेळीमध्ये 7 फोरचा समावेश होता. मोहम्मद हफीजनेही नाबाद 32 रन केले. हफीजने रिझवानसोबत तिसऱ्या विकेटसाठी 4.2 ओव्हरमध्ये नाबाद 67 रनची पार्टनरशीप केली. पाकिस्तानच्या टीमने 2009 साली टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. यंदाच्या वर्ल्ड कपमध्येही टीम उत्कृष्ट कामगिरी करत आहे. पाकिस्तान आणि इंग्लंडने आतापर्यंत स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. याआधी पाकिस्तानने भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानला धूळ चारली होती.
  Published by:Shreyas
  First published: