मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup : बाबर आझमने दाखवली खिलाडूवृत्ती, आऊट झालेल्या हेटमायरला परत बोलावलं, VIDEO

T20 World Cup : बाबर आझमने दाखवली खिलाडूवृत्ती, आऊट झालेल्या हेटमायरला परत बोलावलं, VIDEO

टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) युएई आणि ओमानमध्ये सुरुवात झाली आहे. वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान (West Indies vs Pakistan) यांच्यातल्या सराव सामन्यात बाबर आझमने (Babar Azam) खिलाडूवृत्ती दाखवली.

टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) युएई आणि ओमानमध्ये सुरुवात झाली आहे. वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान (West Indies vs Pakistan) यांच्यातल्या सराव सामन्यात बाबर आझमने (Babar Azam) खिलाडूवृत्ती दाखवली.

टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) युएई आणि ओमानमध्ये सुरुवात झाली आहे. वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान (West Indies vs Pakistan) यांच्यातल्या सराव सामन्यात बाबर आझमने (Babar Azam) खिलाडूवृत्ती दाखवली.

दुबई, 18 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) युएई आणि ओमानमध्ये सुरुवात झाली आहे. ग्रुप-ए आणि ग्रुप-बी मधल्या टीम सुपर-12 मध्ये पोहोचण्यासाठी लढत आहेत, तर दुसरीकडे सुपर-12मध्ये आधीच प्रवेश मिळवलेल्या टीम सराव सामने खेळत आहेत. वर्ल्ड कप असल्यामुळे प्रत्येक टीम सराव सामनेही तितक्याच गांभीर्याने खेळत आहेत, असं असलं तरी खेळाडूंची खिलाडूवृत्ती मात्र कुठेही कमी पडताना दिसत नाहीये. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज (Pakistan vs West Indies) यांच्यातल्या सराव सामन्यात याचाच प्रत्यय आला.

दुबईच्या आयसीसी अॅकेडमी ग्राऊंडवर वेस्ट इंडिजने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण वेस्ट इंडिजची बॅटिंग अपयशी ठरली. पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या शिमरन हेटमायरने (Shimron Hetmyer) काही धमाकेदार शॉट खेळले. 24 बॉलमध्ये 28 रन करून हेटमायर आऊट झाला. शाहीन शाह आफ्रिदीने (Shaheen Afridi) हेटमायरला माघारी पाठवलं.

आफ्रिदीने हेटमायरची विकेट घेतली असती तरी तो आधीच आऊट झाला असता, पण बाबर आझमने (Babar Azam) त्याला पुन्हा खेळण्यासाठी बोलावलं. 15 व्या ओव्हरमध्ये अंपायरने हेटमायरला आऊट दिलं. हसन अलीने टाकलेल्या शॉर्ट पिच बॉलवर हेटमायरने पूल शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या बॅटला बॉल लागला नाही, पण पाकिस्तानी टीमने अपील केल्यानंतर अंपायरने हेटमायरला आऊट दिलं.

अंपायरने आऊट दिल्यानंतर हेटमायरला धक्का बसला. बॅटला बॉल लागला नाही, तर चेन हेल्मेटला लागल्यामुळे आवाज झाल्याचा इशारा हेटमायरने केला. यानंतर बाबर आझमने हेटमायरला पुन्हा खेळण्यासाठी बोलावलं. सराव सामना असल्यामुळे इकडे डीआरएस उपलब्ध नाही.

वेस्ट इंडिजला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून फक्त 130 रनपर्यंत मजल मारता आली. हेटमायरने सर्वाधिक 28 रन केले, तर पोलार्डने 10 बॉलमध्ये 23 रनची आक्रमक खेळी केली. शाहीन आफ्रिदी, हसन अली, हारिस राऊफ यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर इमाद वसीमला एक विकेट घेण्यात यश आलं.

वेस्ट इंडिजने दिलेलं 131 रनचं आव्हान पाकिस्तानने 15.3 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) 41 बॉलमध्ये 50 रन तर फखर झमानने 24 बॉलमध्ये 46 रनची खेळी केली. शोएब मलिक (Shoaib Malik) 14 रनवर नाबाद राहिला. वेस्ट इंडिजकडून हेडन वॉल्शने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या, तर रवी रामपॉलला एक विकेट घेण्यात यश आलं.

First published:
top videos

    Tags: Babar azam, Pakistan, T20 world cup, West indies