• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup : भारताविरुद्ध अशी असणार पाकिस्तानची Playing XI, ड्रेसिंग रूममधली Inside Story

T20 World Cup : भारताविरुद्ध अशी असणार पाकिस्तानची Playing XI, ड्रेसिंग रूममधली Inside Story

टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपमधला (T20 World Cup) आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) 24 ऑक्टोबरला खेळणार आहे. त्याआधी पाकिस्तानच्या टीममधून नवी माहिती (Pakistan Playing XI) समोर आली आहे.

 • Share this:
  मुंबई, 19 ऑक्टोबर : टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपमधला (T20 World Cup) आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) 24 ऑक्टोबरला खेळणार आहे. या दोन्ही टीमचा यंदाच्या स्पर्धेमधला हा पहिलाच मुकाबला आहे. त्याआधी पाकिस्तानच्या टीममधून नवी माहिती (Pakistan Playing XI) समोर आली आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान तीन फास्ट बॉलर आणि 4 ऑलराऊंडर म्हणजेच एकूण 7 बॉलर घेऊन खेळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तानच्या टीमला अजूनपर्यंत भारताला एकदाही वर्ल्ड कपमध्ये हरवता आलेलं नाही, त्यामुळे यावेळी बाबर आझम (Babar Azam) पूर्ण जोर लावेल. जियो टीव्हीसोबत बोलताना पाकिस्तानी टीममधल्या सूत्राने सांगितलं, 'मॅचमध्ये पाकिस्तानी टीम वरिष्ठ आणि अनुभवी खेळाडूंसोबत खेळेल. जर फिटनेसची समस्या नसेल, तर सराव सामन्यात खेळलेली टीमच भारताविरुद्ध खेळेल. बाबर, मोहम्मद रिझवान, फखर झमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक आणि आसिफ अली यांना संधी मिळेल.' वेस्ट इंडिजविरुद्धच्या सराव सामन्यात बाबर आझमने अर्धशतक केलं होतं. तर फखर झमानने 46 रनची खेळी केली होती. हफीज आणि मलिक बॉलिंगही करतात. ऑलराऊंडर म्हणून शादाब खान आणि इमाद वसीम यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच शादाब खानने 2 ओव्हरमध्ये 7 रन दिले होते. तर डावखुरा स्पिनर इमाद वसीमला 3 ओव्हरमध्ये 6 रन देऊन 1 विकेट घेण्यात यश आलं होतं. फास्ट बॉलर म्हणून शाहीन शाह आफ्रिदी, हसन अली आणि हारिस राऊफ यांना खेळवलं जाऊ शकतं. या तिन्ही फास्ट बॉलरना वेस्ट इंडिजविरुद्ध प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या होत्या. पाकिस्तानच्या टीममध्ये सध्या मोहम्मद हफीज सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर आहे. ऑफ स्पिनर असलेल्या हफीजने टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 60 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय शादाब खानने 58, हसन अलीने 52, इमाद वसीमने 51 आणि शाहीन आफ्रिदीने 32 विकेट मिळवल्या. दुसरीकडे भारताकडून कोणत्याही बॉलरला 60 विकेट मिळवता आल्या नाहीत. जसप्रीत बुमराह 59 विकेटसह पहिल्या क्रमांकावर आहे. आर.अश्विनला 52 आणि भुवनेश्वर कुमारला 50 विकेट मिळाल्या आहेत. पाकिस्तानची प्लेयिंग इलेव्हन बाबर आझम, मोहम्मद रिझवान, फखर झमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन शाह आफ्रिदी, हसन हली, हारिस राऊफ
  Published by:Shreyas
  First published: