Home /News /sport /

T20 World Cup : राहुल, रोहित आणि विराट कसे आऊट झाले? आफ्रिदीने केली हुबेहुब नक्कल, पाहा VIDEO

T20 World Cup : राहुल, रोहित आणि विराट कसे आऊट झाले? आफ्रिदीने केली हुबेहुब नक्कल, पाहा VIDEO

यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) पाकिस्तानची (Pakistan) टीम धमाकेदार फॉर्ममध्ये आहे. पाकिस्तानचा फास्ट बॉलर शाहिन आफ्रिदी (Shaheen Afridi) स्कॉटलंडविरुद्धच्या अखेरच्या सुपर-12 सामन्यात मजा मस्तीच्या मूडमध्ये दिसत होता.

पुढे वाचा ...
    दुबई, 11 नोव्हेंबर : यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) पाकिस्तानची (Pakistan) टीम धमाकेदार फॉर्ममध्ये आहे. सुपर-12 स्टेजच्या सगळ्या 5 मॅच जिंकत पाकिस्तानने सेमी फायनलमध्ये धडक मारली. आता सेमी फायनलमध्ये पाकिस्तानचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Pakistan vs Australia) होत आहे. पाकिस्तानचा फास्ट बॉलर शाहिन आफ्रिदी (Shaheen Afridi) स्कॉटलंडविरुद्धच्या अखेरच्या सुपर-12 सामन्यात मजा मस्तीच्या मूडमध्ये दिसत होता. बाऊंड्री लाईनवर उभ्या असलेल्या आफ्रिदीने चाहत्यांना प्रतिक्रिया दिल्या. टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 विकेटने दारूण पराभव केला. शाहिन आफ्रिदी पाकिस्तानच्या या विजयाचा शिल्पकार ठरला, कारण त्याने सुरुवातीपासूनच टीम इंडियाला धक्के दिले. पहिल्या दोन ओव्हरमध्येच शाहिन आफ्रिदीने रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुलला (KL Rahul) माघारी पाठवलं. चौथ्या बॉलवरच रोहितला एलबीडब्ल्यू केलं, यानंतर पुढच्या ओव्हरला त्याने राहुलला बोल्ड केलं. 19 व्या ओव्हरमध्ये आफ्रिदीने विराट कोहलीचीही (Virat Kohli) विकेट घेतली. 49 बॉलमध्ये 57 रन करून विराट आऊट झाला. स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात स्टेडियममध्ये मॅच बघायला आलेल्या चाहत्यांनी शाहिन आफ्रिदीला रोहित, राहुल आणि विराट कसे आऊट झाले? असा प्रश्न शाहिन आफ्रिदीला विचारला. यानंतर आफ्रिदीने या तिघांच्या विकेटची हुबेहुब नक्कल केली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारताचा पराभव केल्यानंतर पाकिस्तानचा आत्मविश्वास चांगलाच बळावला. यानंतर त्यांनी न्यूझीलंड, अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलंडचा पराभव केला. या कामगिरीमुळे पाकिस्तान टी-20 वर्ल्ड कप जिंकण्याची प्रबळ दावेदार झाली आहे. याआधी पाकिस्तानने 2009 साली टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. युएईमधलं पाकिस्तानचं रेकॉर्डही धमाकेदार आहे. इकडे झालेल्या मागच्या 16 टी-20 सामन्यांमध्ये पाकिस्तानचा विजय झाला आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs Pakistan, T20 world cup

    पुढील बातम्या