मुंबई, 11 ऑक्टोबर : दिग्गज ऑलराऊंडर शोएब मलिकची (Shoaib Malik) पाकिस्तानच्या टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup Pakistan) टीममध्ये निवड झाली आहे. शोएब मकसूदच्या पाठीला दुखापत झाल्यामुळे मलिकला टी-20 वर्ल्ड कपच्या टीममध्ये संधी मिळाली. टी-20 क्रिकेटमध्ये मलिकने 11 हजार रन केले आहेत. हे रेकॉर्ड करणारा तो जगातला तिसरा आणि पाकिस्तानचा एकमेव खेळाडू आहे. शोएब मलिकची पाकिस्तान टीममध्ये निवड झाल्यानंतर पाकिस्तानी मीडियामधला एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पाकिस्तान टीमचा वर्ल्ड कपचा पहिला सामना 24 ऑक्टोबरला भारताविरुद्ध होणार आहे.
पाकिस्तानमधल्या स्थानिक चॅनलने शोएब मलिकच्या आंतरराष्ट्रीय करियरबद्दलचा एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. शरीफ गेले, मुशर्रफ आले, जरदारी गेले पुन्हा शरीफ आले, काळ बदलला खान आले, तरीही बदलला नाही शोएब मलिक, असं रॅप या व्हिडिओमध्ये करण्यात आलं आहे. मलिकचं वय 39 वर्ष आणि 252 दिवस आहे. मलिकची ही 14 वी आयसीसी स्पर्धा आहे. तो पाकिस्तानकडून 5 टी-20 वर्ल्ड कप खेळला आहे. याशिवाय 2 वनडे वर्ल्ड कप आणि 6 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही त्याने पाकिस्तानचं प्रतिनिधीत्व केलं.
What a tribute to @realshoaibmalik by @SAMAATV 😂😂👏👏👏👏👏👏👏👏 Wow wow just wow brilliant work by Samaa Tv Team 😍❤️@FGMallick @syedadeelahsan#T20WorldCup #shoaibmalik pic.twitter.com/xX8ETRLRvC
— Qadir Khawaja (@iamqadirkhawaja) October 9, 2021
'अफगाणिस्तानमध्ये अमेरिका आली, बॉम्ब फेकले, ड्रोन उडवले, लढाई हरली, निघून गेले, मग तालिबान आलं, बदलला नाही शोएब मलिक. 15 रुपये लीटर मिळणारं पेट्रोल 130 वर आलं, एंटिना फोनऐवजी एण्ड्रॉईड फोन आला, तरीही बदलला नाही शोएब मलिक,' असंही या व्हिडिओमध्ये बोललं गेलं आहे.
वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये पाकिस्तानने 4 बदल केले आहेत. फखर झमान, सरफराज अहमद आणि हैदर अली यांना पाकिस्तानच्या 15 सदस्यांच्या टीममध्ये स्थान मिळालं आहे. शोएब मलिकचं टी-20 क्रिकेटमधलं रेकॉर्ड चांगलं आहे. 443 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 11,033 रन केले, त्याची सरासरी 37 ची आहे. तसंच त्याने 67 अर्धशतकं केली आहेत. नाबाद 95 रन त्याचा सर्वोत्तम स्कोअर आहे. एवढच नाही तर त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 152 विकेट घेतल्या. 13 रनमध्ये 5 विकेट त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने 7.04 च्या इकोनॉमी रेटने बॉलिंग केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pakistan, T20 world cup