• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup : एकही मॅच न गमावता पाकिस्तान सेमी फायनलमध्ये, या 4 टीममध्ये होणार Knock Out!

T20 World Cup : एकही मॅच न गमावता पाकिस्तान सेमी फायनलमध्ये, या 4 टीममध्ये होणार Knock Out!

टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सुपर-12 स्टेजमध्ये पाचही सामने जिंकत पाकिस्तानने (Pakistan Semi Final) सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे.

 • Share this:
  शारजाह, 7 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सुपर-12 स्टेजमध्ये पाचही सामने जिंकत पाकिस्तानने (Pakistan Semi Final) सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. सुपर-12 मध्ये एकही सामना न गमावण्याचा पराक्रम पाकिस्तानने केला आहे. स्कॉटलंडविरुद्धच्या (Pakistan vs Scotland) मॅचमध्ये पाकिस्तानचा तब्बल 72 रनने विजय झाला. पाकिस्तानने दिलेलं 190 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्कॉटलंडला 20 ओव्हरमध्ये 117/6 पर्यंतच मजल मारता आली. शादाब खानने 2 विकेट घेतल्या, तर शाहिन आफ्रिदी, हारिस राऊफ आणि हसन अली यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. स्कॉटलंडकडून रिची बॅरिंगटनने 37 बॉलमध्ये नाबाद 54 रन केले. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर पाकिस्तानने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 189 रन केले. शोएब मलिकने (Shoaib Malik) 18 बॉलमध्ये नाबाद 54 रनची विस्फोटक खेळी केली. मलिकने 6 सिक्स आणि एक फोर लगावली. यंदाच्या वर्ल्ड कपमधलं सगळ्यात जलद अर्धशतक करण्याच्या केएल राहुलच्या विक्रमाशीही मलिकने बरोबरी केली. राहुलने स्कॉटलंडविरुद्धच 18 बॉलमध्ये अर्धशतक केलं होतं. याशिवाय बाबर आझमने 66 रन केले. सेमी फायनल ठरली याचसह वर्ल्ड कपच्या सेमी फायनलच्या टीमही निश्चित झाल्या आहेत. पहिल्या ग्रुपमधून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया तर दुसऱ्या ग्रुपमधून पाकिस्तान आणि न्यूझीलंडने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता पहिली सेमी फायनल इंग्लंड आणि न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यात 10 नोव्हेंबरला तर दुसरी सेमी फायनल पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यात 11 नोव्हेंबरला होणार आहे. या दोन सेमी फायनलमधल्या विजेत्या टीम 14 नोव्हेंबरला फायनल खेळतील.
  Published by:Shreyas
  First published: