• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup : न्यूझीलंडच्या टीममध्ये स्थान नाही, रॉस टेलर वर्ल्ड कपमध्ये या टीमसोबत दिसणार!

T20 World Cup : न्यूझीलंडच्या टीममध्ये स्थान नाही, रॉस टेलर वर्ल्ड कपमध्ये या टीमसोबत दिसणार!

न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू रॉस टेलर (Ross Taylor) याला टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या (T20 World Cup) 15 खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आलं नाही. न्यूझीलंडच्या टीमने वगळल्यानंतर आता रॉस टेलर टी-20 वर्ल्ड कपमध्ये दिसणार आहे, पण नव्या भूमिकेत.

 • Share this:
  दुबई, 17 ऑक्टोबर : न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू रॉस टेलर (Ross Taylor) याला टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या (T20 World Cup) 15 खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आलं नाही. न्यूझीलंडच्या टीमने वगळल्यानंतर आता रॉस टेलर टी-20 वर्ल्ड कपमध्ये दिसणार आहे, पण नव्या भूमिकेत. या स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणाऱ्या पपुआ न्यू गिनी (PNG) टीमचा मेंटर बनण्याचा निर्णय टेलरने घेतला आहे. युएई आणि ओमानमध्ये आजपासूनच या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. रॉस टेलरने अखेरची टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच नोव्हेंबर 2020 साली खेळली होती, जेव्हा किवी टीम वेस्ट इंडिजविरुद्ध खेळली होती. टेलरने आपल्या करियरमध्ये 102 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये न्यूझीलंडचं प्रतिनिधीत्व केलं. याआधी पपुआ न्यू गिनीला 2014 आणि 2016 वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय होता आलं नव्हतं. 2019 क्वालिफायरमध्ये पपुआ न्यू गिनीची टीम पहिल्या क्रमांकावर राहिली.
  View this post on Instagram

  A post shared by BLACKCAPS (@blackcapsnz)

  असद वालाच्या नेतृत्वात पीएनजीची टीम टी-20 वर्ल्ड कपच्या ग्रुप-बीमध्ये आपला पहिला सामना ओमानविरुद्ध खेळत आहे. माझ्यासाठी आणि खेळाडूंसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. बऱ्याच काळानंतर आम्हाला टी-20 वर्ल्ड कप खेळण्याची संधी मिळत आहे. आम्ही खूप वेळा जवळ आलो, पण आता मात्र आम्ही वर्ल्ड कप खेळत आहोत, अशी प्रतिक्रिया असद वालाने दिली. न्यूझीलंडची टीम केन विलियमसन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, डेवन कॉनवे, टिम साउदी, ट्रेंट बोल्ट, टिम सीफर्ट (यष्टीरक्षक), मिचेल सेंटनर, ईश सोढ़ी, ग्लेन फिलिप्स, जिम्मी नीशम, डेरिल मिचेल, काइल जॅमिसन, लॉकी फर्ग्यूसन, मार्क चेपमैन आणि टॉड एस्टल
  Published by:Shreyas
  First published: