अबु धाबी, 10 नोव्हेंबर : केन विलियमसन (Kane Williamson) फक्त दमदार बॅटरच नाही तर उत्कृष्ट फिल्डरही आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडच्या (England vs New Zealand Semi Final) कर्णधाराने पुन्हा एकदा हेच दाखवून दिलं. अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियममध्ये केन विलियमसनने पहिले टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर त्याने इंग्लंडला पहिला धक्का देण्यात मोठं योगदान दिलं. एडम मिल्नेच्या बॉलिंगवर विलियमसनने जॉनी बेयरस्टोचा एका हातात भन्नाट कॅच पकडला.
एडम मिल्ने इनिंगची सहावी ओव्हर टाकण्यासाठी आला. पहिल्याच बॉलला जॉनी बेयरस्टोने कव्हर ड्राईव्ह शॉट मारला, पण विलियमसनने उडी मारत कॅच पकडला. बेयरस्टो आऊट आहे का नाही, हे पाहण्यासाठी मैदानातले अंपायर थर्ड अंपायरकडे गेले, मग थर्ड अंपायरनेही बेयरस्टो आऊट असल्याचं सांगितलं. बेयरस्टोने 17 बॉलमध्ये 2 फोरच्या मदतीने 13 रन केले होते.
View this post on Instagram
टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडला विजयासाठी 167 रनचं आव्हान दिलं आहे. मोईन अलीच्या अर्धशतकामुळे इंग्लंडला 166/4 पर्यंत मजल मारता आली. मोईन अलीने 37 बॉलमध्ये नाबाद 51 रन केले. मोईनच्या या खेळीमध्ये 3 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. याशिवाय डेव्हिड मलाननेही 41 रन केल्या. न्यूझीलंडकडून टीम साऊदी, एडम मिल्ने, ईश सोढी आणि एडम मिल्ने यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: T20 world cup