मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : स्कॉटलंडकडून शिका! न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या ओव्हरपर्यंत दिली लढत

T20 World Cup : स्कॉटलंडकडून शिका! न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या ओव्हरपर्यंत दिली लढत

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) स्कॉटलंडच्या नवख्या टीमने न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand vs Scotland) सामन्यात अखेरपर्यंत झुंज दिली.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) स्कॉटलंडच्या नवख्या टीमने न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand vs Scotland) सामन्यात अखेरपर्यंत झुंज दिली.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) स्कॉटलंडच्या नवख्या टीमने न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand vs Scotland) सामन्यात अखेरपर्यंत झुंज दिली.

  • Published by:  Shreyas

दुबई, 3 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) स्कॉटलंडच्या नवख्या टीमने न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand vs Scotland) सामन्यात अखेरपर्यंत झुंज दिली. न्यूझीलंडने दिलेल्या 173 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्कॉटलंडला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 156 रनपर्यंत मजल मारता आली, त्यामुळे त्यांचा फक्त 16 रनने पराभव झाला. न्यूझीलंडच्या स्कोअरचा पाठलाग करण्यासाठी आलेली स्कॉटलंड एका वेळी सामना जिंकेल असं वाटत होतं, पण किवी टीमच्या अनुभवी बॉलरनी मोक्याच्या क्षणी मॅचवर पकड बनवली.

स्कॉटलंडच्या मायकल लिस्कने (Michael Leask) 20 बॉलमध्ये नाबाद 42 रन केले, यात 3 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. मॅथ्यू क्रॉसने एडम मिल्नेच्या एका ओव्हरला लागोपाठ 5 फोर मारल्या, पण तरीही स्कॉटलंडला हे आव्हान पार करता आलं नाही. न्यूझीलंडकडून ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult) आणि ईश सोढीला (Ish Sodhi) प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. टीम साऊदीला (Tim Southee) एक विकेट घेण्यात यश आलं.

टीम इंडियाच्या सेमी फायनलला पोहोचण्यासाठी स्कॉटलंडने हा सामना जिंकणं गरजेचं होतं, पण न्यूझीलंडच्या विजयाने भारताला धक्का लागला आहे. सेमी फायनलला पोहोचण्यासाठी आता भारताला अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाचा मोठ्या फरकाने पराभव करावा लागणार आहे. तर न्यूझीलंडला अफगाणिस्तान किंवा नामिबियाविरुद्धचा सामना गमवावा लागेल.

या सामन्यात स्कॉटलंडने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. न्यूझीलंडची अवस्था 6.1 ओव्हरमध्ये 52/3 अशी झाली होती. डॅरेल मिचेल 13 रनवर, केन विलियमसन शून्य आणि डेवॉन कॉनवे एक रन करून पॅव्हेलियनमध्ये परतले होते, पण मार्टिन गप्टीलने (Martin Guptill) ग्लेन फिलिप्सच्या मदतीने स्कॉटलंडच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. 56 बॉलमध्ये 93 रन करून गप्टील आऊट झाला. त्याच्या या खेळीमध्ये 6 फोर आणि 7 सिक्सचा समावेश होता. ग्लेन फिलिप्सने 37 बॉलमध्ये 33 रन केले. गप्टील आणि फिलिप्स यांच्यात चौथ्या विकेटसाठी 105 रनची पार्टनरशीप झाली, त्यामुळे न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 172 रनपर्यंत मजल मारली.

T20 World Cup : मार्टिन गप्टील पुन्हा झाला टीम इंडियाचा 'व्हिलन', दुसऱ्यांदा मोडणार भारताचं स्वप्न!

First published:

Tags: T20 world cup