• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • T20 World Cup IND vs NZ : टीम इंडियाने न्यूझीलंडसमोरही गुडघे टेकले, सेमी फायनलचं स्वप्न भंगणार!

T20 World Cup IND vs NZ : टीम इंडियाने न्यूझीलंडसमोरही गुडघे टेकले, सेमी फायनलचं स्वप्न भंगणार!

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या (India vs New Zealand) बॅट्समननी लाज घालवली आहे. पाकिस्तानविरुद्ध 10 विकेटने पराभव झाल्यानंतर आता न्यूझीलंडने भारताला 8 विकेटने हरवलं

  • Share this:
    दुबई, 31 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या (India vs New Zealand) बॅट्समननी लाज घालवली आहे. पाकिस्तानविरुद्ध 10 विकेटने पराभव झाल्यानंतर आता न्यूझीलंडने भारताला 8 विकेटने हरवलं आहे. भारताने दिलेलं 111 रनचं आव्हान न्यूझीलंडने 14.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. डॅरेल मिचेलने 35 बॉलमध्ये 49 रन केले, तर केन विलियमसन 33 रनवर नाबाद राहिला. भारताकडून जसप्रीत बुमराहने दोन्ही विकेट घेतल्या. पहिले बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 110 रनच करता आल्या. रवींद्र जडेजा 19 बॉलमध्ये 26 रनवर नाबाद राहिला, तर हार्दिकने 23 रनची खेळी केली. न्यूझीलंडकडून ट्रेन्ट बोल्टने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर ईश सोढीला 2 विकेट मिळाल्या. टीम साऊदी आणि एडम मिल्नेला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. भारतीय टीममध्ये दोन बदल या सामन्यात टीम इंडियाने दोन बदल केले. संघर्ष करणाऱ्या भुवनेश्वर कुमारऐवजी शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) संधी देण्यात आली आहे, तर सूर्यकुमार यादवऐवजी इशान किशनचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. न्यूझीलंडच्या टीममध्ये ईश सोढी आणि मिचेल सॅन्टनर हे दोन स्पिनर असल्यामुळे विराटने डावखुरा बॅट्समन असलेल्या ईशान किशनला संधी देण्यात आली, पण या संधीचं इशान किशनला सोनं करता आलं नाही. टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक 4 शतकं करणाऱ्या रोहित शर्माला (Rohit Sharma) ओपनिंगला न पाठवण्याचा धक्कादायक निर्णय टीम इंडियाने घेतला. रोहित शर्माऐवजी ईशान किशन (Ishan Kishan) केएल राहुलसोबत (KL Rahul) ओपनिंगला आला, पण हा निर्णय चुकीचा असल्याचं 17 व्या बॉललाच निष्पन्न झालं. 8 बॉलमध्ये 4 रन करून ईशान किशन आऊट झाला. भारतीय टीम रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, ईशान किशन, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह न्यूझीलंडची टीम मार्टिन गप्टील, डॅरेल मिचेल, केन विलियमसन, जेम्स नीशम, डेवॉन कॉनवे, ग्लेन फिलिप्स, एडम मिल्ने, मिचेल सॅन्टनर, ईश सोढी, टीम साऊदी, ट्रेन्ट बोल्ट भारतीय टीमने टी-20 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडला एकदाही पराभूत केलेलं नाही. याआधी 2007 आणि 2016 सालच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा किवी टीमने पराभव केला होता. वर्ल्ड कपमध्ये 18 वर्षांपूर्वी भारताने न्यूझीलंडला पराभूत केलं होतं. 2003 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने किवींना 7 विकेटने धूळ चारली होती. टीम इंडिया सुपर-12 मधूनच आऊट? पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाचं सेमी फायनलला पोहोचणं आणखी कठीण झालं आहे. पाकिस्तानने तीन सामन्यांमध्ये तीन विजय मिळवल्यामुळे त्यांचं सेमी फायनलचं तिकीट जवळपास निश्चित झालं आहे. भारत आणि न्यूझीलंडचे उरलेले सामने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध आहेत. कागदावर स्कॉटलंड आणि नामबियाच्या टीम दुबळ्या आहेत, तर अफगाणिस्तानमध्ये मोठा उलटफेर करण्याची शक्यता आहे. भारताने उरलेले तिन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले आणि न्यूझीलंडचा अफगाणिस्तानविरुद्ध पराभव झाला, तरच नेट रन रेटच्या माध्यमातून टीम इंडिया सेमी फायनलला पोहोचू शकते.
    Published by:Shreyas
    First published: