मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

INDvsPAK; 5 वर्षापूर्वीची MS Dhoni ने केलेली भविष्यावाणी खरी ठरली

INDvsPAK; 5 वर्षापूर्वीची MS Dhoni ने केलेली भविष्यावाणी खरी ठरली

MS Dhoni

MS Dhoni

टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 Worldcup)अद्याप भारतानं पाकिस्तानकडून (INDvsPAK)एकदाही पराभवाचा सामना केलेला नाही. मात्र, यंदा म्हणजेच 2021 ला इतिहास बदलला.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ला, 25 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) पाकिस्तानकडून टीम इंडियाला (INDvsPAK) पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला. या सामन्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अशातच मेटॉर महेंद्र सिंह धोनीचा(MS Dhoni) एस किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो किस्सा 5 वर्षापूर्वीचा असून पाकिस्तानकडून कधीतरी नक्कीच आपण हरणार आहोत असे धोनीने व्हायरल झालेल्या व्हिडिओत म्हटले आहे.

गेल्या तीन दशकांमध्ये भारत आणि पाकिस्तान हे संघ विश्वचषक स्पर्धेत 12 वेळा आमने-सामने आले होते आणि यातील प्रत्येक सामन्यात भारताने विजय मिळवला होता. या स्पर्धेत भारत 12-0 ने आघाडीवर होता. मात्र रविवारच्या सामन्यात पाकिस्तानने भारतावर मात करत भारताचा विजयरथ रोखला.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत धोनी काय म्हणाला आहे नेमकं?

2016 च्या टी-20 विश्वचषकातील सामन्यात भारताने पाकिस्तानवर मात केली होती. हा भारताचा पाकिस्तानवरील 11 वा विजय होता. या विजयानंतर धोनीने माध्यमांच्या प्रतिनिधींशी बातचित केली होती. त्यावेळी धोनीने भारताच्या पाकिस्तानसोबतच्या आगामी लढतींवर भाष्य केलं होते.

धोनी तेव्हा म्हणाला होता की, “अर्थातच आम्हाला या विक्रमाचा (11-0 ने आघाडीवर असल्याचा) अभिमान वाटला पाहिजे. विश्वचषकात आपण पाकिस्तानसोबत कधीही हरलो नाही, या गोष्टीचा अभिमान आहेच, परंतु नेहमीच असेच होईल असे नाही. आज नाहीतर उद्या, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, 20 वर्षांनी कदाचित 50 वर्षांनी, कधीतरी आपण नक्कीच हरणार आहोत.” त्याने म्हटल्याप्रमाणे पाच वर्षांनंतर भारत पाकिस्तानसोबत टी-20 विश्वचषकात पराभूत झाला आहे.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात सुरुवातीलाच खराब सुरुवात आणि सुमार फलंदाजीमुळे टीम इंडिया (Team India)पराभूत झाला. आधी खराब फलंदाजीमुळे केवळ 151 धावा भारताने केल्या. ज्यानंतर पाकिस्तान संघाने अप्रतिम अशी फलंदाजी करत सामना 10 विकेट्सने खिशात घातला.

टी-20 वर्ल्डकपमध्ये अद्याप भारतानं पाकिस्तानकडून एकदाही पराभवाचा सामना केलेला नाही.  टीम इंडियांनं सन 2007 च्या टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पाकिस्तानला धूळ चारत ट्रॉफी पटकावली होती. वनडे वर्ल्डकपमध्येही पाकिस्तान आतापर्यंत एकदाही टीम इंडियाचा पराभव करू शकलेला नाही.

First published:

Tags: India vs Pakistan, MS Dhoni, T20 cricket, T20 league, T20 world cup