मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : CSK ला चॅम्पियन केल्यावर धोनी पुन्हा टीम इंडियात दाखल, मैदानात येताच कोणाला भेटला?

T20 World Cup : CSK ला चॅम्पियन केल्यावर धोनी पुन्हा टीम इंडियात दाखल, मैदानात येताच कोणाला भेटला?

आयपीएल 2021 मध्ये (IPL 2021) चेन्नई सुपर किंग्सना (CSK) चॅम्पियन बनवल्यानंतर एमएस धोनी (MS Dhoni) पुन्हा टीम इंडियामध्ये (Team India) दाखल झाला आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) धोनी टीम इंडियाचा मेंटर (MS Dhoni Mentor) असणार आहे.

पुढे वाचा ...
    दुबई, 17 ऑक्टोबर : आयपीएल 2021 मध्ये (IPL 2021) चेन्नई सुपर किंग्सना (CSK) चॅम्पियन बनवल्यानंतर एमएस धोनी (MS Dhoni) पुन्हा टीम इंडियामध्ये (Team India) दाखल झाला आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) धोनी टीम इंडियाचा मेंटर (MS Dhoni Mentor) असणार आहे. भारतीय टीममध्ये पुन्हा दाखल झाल्यानंतर बीसीसीआयने धोनीचे फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. या फोटोमध्ये धोनी टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, बॅटिंग प्रशिक्षक विक्रम राठोड, बॉलिंग कोच भरत अरुण आणि फिल्डिंग कोच आर.श्रीधर यांच्यासोबत दिसत आहे. आजपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात झाली असली तरी भारताचा पहिला सामना 24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. त्याआधी टीम इंडिया दोन सराव सामने खेळणार आहे. 18 ऑक्टोबर म्हणजेच सोमवारी संध्याकाळी 7.30 वाजता भारताचा पहिला सराव सामना इंग्लंडविरुद्ध तर 20 ऑक्टोबरला दुपारी 3.30 वाजता ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) एमएस धोनीबाबत (MS Dhoni) प्रतिक्रिया दिली आहे. एमएस धोनी टीम इंडियासोबत मेंटर असल्यामुळे आमचं मनोबल वाढेल. तो टीममध्ये आल्यामुळे आम्ही खूश आहोत, असं विराट म्हणाला. धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 2007 साली टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. आयसीसीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विराट कोहली बोलत होता. 'धोनीकडे भरपूर अनुभव आहे. तो स्वत: उत्साहित आहे. धोनी आमच्या सगळ्यांसाठी कायमच मेंटर राहिल. आपल्या करियरच्या सुरुवातीलाच एवढी मोठी स्पर्धा खेळणाऱ्या तरुणांना याचा नक्कीच फायदा होईल. धोनीच्या सल्ल्यामुळे आम्हाला एक ते दोन टक्के आणखी चांगली कामगिरी करायला मदत होईल,' असं वक्तव्य विराटने केलं. एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने शुक्रवारी आयपीएलचा किताब चौथ्यांदा जिंकला. 15 ऑगस्ट 2020 साली धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. याआधी तो 2019 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध अखेरची आंतरराष्ट्रीय मॅच खेळला होता.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: MS Dhoni, T20 world cup, Team india

    पुढील बातम्या