• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • 'तो ज्यादा काही करु शकत नाही', MS Dhoni च्या नव्या रोलवर सुनील गावस्करांनी सोडले मौन

'तो ज्यादा काही करु शकत नाही', MS Dhoni च्या नव्या रोलवर सुनील गावस्करांनी सोडले मौन

Sunil Gavaskar

Sunil Gavaskar

महेंद्रसिंग धोनीची (MS Dhoni) ICC T20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा मेटॉर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. धोनी आतापर्यंत कोचिंग स्टाफमध्ये खूप सक्रिय आहे.

 • Share this:
  दुबई, 25 ऑक्टोबर : अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात सुरुवातीलाच खराब सुरुवात आणि सुमार फलंदाजीमुळे भारतीय संघ (Team India)पाकिस्तानाकडून पहिल्यांदाच पराभूत झाला. या पराभवानंतर क्रिकेट जगतातून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. कोणी खेळांडूना तर कोणी , मेटॉर भूमिकेत असणाऱ्या महेंद्र सिंह धोनीला (MS Dhoni) जबाबदार धरले आहे. मात्र, महान टेस्ट बॅट्समन सुनील गावस्कर (says sunil gavaskar on ms dhoni new role) यांनी धोनीची बाजू मांडत मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंना चांगलेच सुनावले आहे 72 वर्षीय गावस्कर यांनी काल झालेल्या सामन्यावर आपले मत व्यक्त केले. 'मेटॉर अधिक काही करु शकत नाही. ड्रेसिंग रूममध्ये तयार होण्यास तो तुम्हाला मदत करू शकतो. गरज पडल्यास रणनिती बदलण्यात तो तुम्हाला मदत करू शकतो. हा खूप वेगवान खेळ आहे. तो वेळप्रसंगी बॅट्समन आणि बॉलर्सशी बोलु शकतो. धोनीला आणण्याची कल्पना चांगली असली तरी धोनीला ड्रेसिंग रूममध्येच थांबावे लागेल. अशी भूमिका मांडत गावस्कर यांनी मैदानातील खेळाडूंच्या खराब कामगिरीवर बोट ठेवले आहे. खरतंर मैदानात खेळाडूंनी महत्त्वाची कामगिरी बजावणे गरजेचे असते. खेळाडू मैदानावरील दडपण कसे हाताळतो यावर निकाल अवलंबून असतो. असे मत गावस्कर यांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान, पाकिस्तानच्या TV शोमध्ये पाकिस्तानच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणले जाणारे इंझमाम उल हक यांनी टीम इंडियाच्या पराभवाला धोनीला जबाबदर धरले आहे. बीसीसीआयचा धोनीला मेटॉर बनवण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे त्यांना म्हटले आहे. अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात सुरुवातीलाच खराब सुरुवात आणि सुमार फलंदाजीमुळे भारतीय संघ (Team India)पराभूत झाला. आधी खराब फलंदाजीमुळे केवळ 151 धावा भारताने केल्या. ज्यानंतर पाकिस्तान संघाने अप्रतिम अशी फलंदाजी करत सामना 10 विकेट्सने खिशात घातला.
  Published by:Dhanshri Otari
  First published: