नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर: टी20 वर्ल्डकपला (ICC T20 World Cup 2021) सुरुवात झाली असून 24 ऑक्टोबरला टीम इंडिया आणि पाकिस्तान (INDvsPAK)यांच्यात महामुकाबला होणार आहे. दरम्यान, पाकिस्तानचा बॅटिंग कंसल्टेंट मैथ्यू हेडन (Matthew Hayden) ने केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्याकडून पाकच्या संघाला धोका असल्याची भिती व्यक्त केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघावर लक्ष ठेवून असणाऱ्या मैथ्यू हेडनने एका वृत्तसंस्थेशी बोलताना केएल राहुल आणि ऋषभ पंत टी20 वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
'मी लोकेश राहुलला खेळताना पाहिले आहे. त्याची आक्रमक बॅटिंग पाकिस्तानसाठी धोक्याची असू शकते. मी त्याचा संघर्ष आणि त्याचे वर्चस्व छोट्या स्वरूपात पाहिले आहे. तसेच तो पुढे म्हणाला, लोकेश राहुल शिवाय ऋषभ पंतदेखील दमदार कामगिरी करण्यात निष्णात आहे. कोणत्याही प्रकारचा गोलंदाज असो, पंत त्या गोलंदाजाला थेट मैदानाबाहेर षटकार मारण्याची क्षमता राखतो. त्याच्याकडे खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यामुळे त्याला जर वेळेवर बाद केलं नाही तर तोदेखील पाकिस्तानच्या गोलंदाजीचा समाचार घेऊ शकतो", असंही हेडन म्हणाला.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने ५ सामने झाले. यामध्ये भारताने पाकिस्तान्यांना माती चारून घरी पाठवलं आहे. टी-२० विश्वचषकातील टीम इंडियाचा पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. दोन्ही संघ बराच काळानंतर एक सामना खेळत आहेत. जर आपण टी -२० विश्वचषकाबद्दल बोललो तर दोन्ही संघांनी आत्तापर्यंत ५ सामने खेळले आहेत, ज्यात टीम इंडियाने पाचही सामने जिंकले आहेत.
भारतीय संघाचा टी२० विश्वचषकातील पहिला सामना पाकिस्तान विरूद्ध २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ कसून तयारी करत आहे. कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री आणि मेंटॉर महेंद्रसिंग धोनी यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचा संघ दमदार कामगिरी करेल याची साऱ्यांनाच खात्री आहे. मूळ स्पर्धेआधी भारताने दोन सराव सामने खेळले. त्यातील पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडवर १९व्या षटकात तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर १८व्या षटकात विजय मिळवला आहे.
Published by:Dhanshri Otari
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.