मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup : 5 बॉलमध्ये 3 विकेट, रबाडाने केलं बांगलादेशला घायाळ, वर्ल्ड कपमधला Lowest Score

T20 World Cup : 5 बॉलमध्ये 3 विकेट, रबाडाने केलं बांगलादेशला घायाळ, वर्ल्ड कपमधला Lowest Score

Photo- T20 World Cup/Twitter

Photo- T20 World Cup/Twitter

कागिसो रबाडा (Kagiso Rabada) टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) धमाकेदार कामगिरी करत आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात (South Africa vs Bangladesh) रबाडाने 5 बॉलमध्ये 3 विकेट घेतल्या.

अबु धाबी, 2 नोव्हेंबर : कागिसो रबाडा (Kagiso Rabada) टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) धमाकेदार कामगिरी करत आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात (South Africa vs Bangladesh) रबाडाने 5 बॉलमध्ये 3 विकेट घेतल्या. रबाडाच्या या कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेचं सेमी फायनलला पोहोचण्याचं स्वप्न अजूनही कायम आहे. बांगलादेशच्या टीमने या सामन्यात पहिले बॅटिंग करत फक्त 84 रन केले. टी-20 वर्ल्ड कपमधला बांगलादेशचा पहिले बॅटिंग करतानाचा हा निच्चांकी स्कोअर आहे. याआधी 2014 साली हाँगकाँगविरुद्धच्या मॅचमध्ये बांगलादेशला 108 रन करता आले होते.

कागिसो रबाडाने इनिंगच्या चौथ्या ओव्हरच्या पाचव्या बॉलला मोहम्मद नईमला 9 रनवर आऊट केलं. पुढच्याच बॉलवर रबाडाने सौम्य सरकारला शून्य रनवर एलबीडब्ल्यू केलं. पुढच्या ओव्हरच्या पहिल्या दोन बॉलवर रबाडाला विकेट मिळाली नाही, पण तिसऱ्या बॉलवर त्याने मुशफिकुर रहीमला शून्य रनवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.

कागिसो रबाडाने टी-20 वर्ल्ड कपच्या 4 सामन्यांमध्ये 21 च्या सरासरीने 5 विकेट घेतल्या आहेत. बांगलादेशविरुद्ध त्याने 4 ओव्हरमध्ये 20 रन देऊन 3 विकेट घेतल्या. टी-20 आंतरराष्ट्रीय करियरमधली रबाडाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. दक्षिण आफ्रिकेच्या टीमला आतापर्यंत एकदाही टी-20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. रबाडाने टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 39 मॅच खेळून 46 विकेट घेतल्या. तर एकूण टी-20 करियरमध्ये रबाडाने 134 मॅच खेळून 177 विकेट पटकवाल्या.

दक्षिण आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर

दक्षिण आफ्रिकेची टीम सुपर-12 ग्रुप-1 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. आफ्रिकेने 3 पैकी 2 मॅच जिंकल्या आहेत त्यामुळे त्यांच्या खात्यात 4 पॉईंट्स आहेत. इंग्लंडची टीम 8 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियानेही दक्षिण आप्रिकेप्रमाणेच 3 पैकी 2 मॅच जिंकल्या आहेत, पण दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट चांगला असल्यामुळे ते कांगारूंच्या पुढे आहेत. इंग्लंडची टीम सेमी फायनलमध्ये आधीच पोहोचली आहे, त्यामुळे आता दुसऱ्या स्थानासाठी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत स्पर्धा आहे. वेस्ट इंडिजच्या टीमला 3 पैकी एकच मॅच जिंकता आली आहे, त्यामुळे वेस्ट इंडिजचं सेमी फायनलला पोहोचणं अशक्य झालं आहे.

First published:

Tags: T20 world cup