Home /News /sport /

T20 World Cup : बटलरच्या वादळी खेळीने कांगारूंची धूळधाण, इंग्लंडची विजयी हॅट्रिक

T20 World Cup : बटलरच्या वादळी खेळीने कांगारूंची धूळधाण, इंग्लंडची विजयी हॅट्रिक

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) इंग्लंडने विजयाची हॅट्रिक साधली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा (Australia vs England) 8 विकेटने दणदणीत विजय झाला आहे.

    दुबई, 30 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) इंग्लंडने विजयाची हॅट्रिक साधली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा (Australia vs England) 8 विकेटने दणदणीत विजय झाला आहे. ऑस्ट्रेलियाने ठेवलेलं 126 रनचं आव्हान इंग्लंडने 11.4 ओव्हरमध्येच पार केलं. जॉस बटलरने (Jos Buttler) 32 बॉलमध्ये नाबाद 71 रन केले. 221.88 च्या स्ट्राईक रेटने केलेल्या या खेळीमध्ये बटलरने 5 फोर आणि 5 सिक्स लगावल्या. जेसन रॉयने 22 आणि जॉनी बेयरस्टोने नाबाद 16 रनची खेळी करून बटलरला चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाकडून एश्टन अगर आणि एडम झम्पा यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. या सामन्यामध्ये इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गन (Eoin Morgan) याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर इंग्लंडच्या बॉलर्सनी सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाला धक्के दिले. कांगारूंची अवस्था 21/4 अशी बिकट झाली होती, पण कर्णधार एरॉन फिंचने वेड, अगर आणि तळाच्या खेळाडूंना घेऊन ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 20 ओव्हरमध्ये 125 रनपर्यंत पोहोचवला. ऑस्ट्रेलियाचा या सामन्यात ऑल आऊट झाला. क्रिस जॉर्डनने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर क्रिस वोक्स आणि टायमल मिल्सला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. आदिल रशीद आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. इंग्लंडचा सुपर-12 मधला हा तीन सामन्यांमधला तिसरा विजय आहे, या विजयासह इंग्लंडचं सेमी फायनलमधलं स्थान जवळपास निश्चित झालं आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने तीनपैकी दोन सामने जिंकले असून एकामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. सुपर-12च्या पहिल्या ग्रुपमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासह वेस्ट इंडिज, श्रीलंका, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेची टीम आहे. या ग्रुपमधल्या टॉप-2 टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवतील.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: T20 world cup

    पुढील बातम्या