Home /News /sport /

T20 World Cup साठी पठाणने सांगितली टीम इंडियाची परफेक्ट Playing XI, कॅप्टनलाच केलं बाहेर!

T20 World Cup साठी पठाणने सांगितली टीम इंडियाची परफेक्ट Playing XI, कॅप्टनलाच केलं बाहेर!

2022 सालचा टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात खेळवला जाणार आहे. या वर्ल्ड कपआधी टीम इंडिया (Team India) 4 सीरिज खेळणार आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने (Irfan Pathan) टी-20 वर्ल्ड कपसाठी भारताची प्लेयिंग इलेव्हनच निवडून टाकली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 20 जून : 2022 सालचा टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात खेळवला जाणार आहे. या वर्ल्ड कपआधी टीम इंडिया (Team India) 4 सीरिज खेळणार आहे. आयर्लंडविरुद्ध 2 टी-20, इंग्लंडविरुद्ध 3, वेस्ट इंडिजविरुद्ध 5 आणि आशिया कपमध्ये टीम इंडियाचे खेळाडू मैदानात उतरतील. या 4 सीरिजमधूनच टीम इंडियाची वर्ल्ड कपसाठीची 15 जणांची टीम निवडली जाईल. पण भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने (Irfan Pathan) टी-20 वर्ल्ड कपसाठी भारताची प्लेयिंग इलेव्हनच निवडून टाकली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये टीम इंडियाचा कर्णधार असलेल्या ऋषभ पंतलाच (Rishabh Pant) पठाणने बाहेर केलं आहे, त्याच्याऐवजी दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) त्याने संधी दिली आहे. तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी पठाणने विराट कोहलीलाच (Virat Kohli) पसंती दिली आहे. विराट सध्या फॉर्ममध्ये नसला तरी त्याचं ऑस्ट्रेलियातलं रेकॉर्ड उल्लेखनीय आहे, त्यामुळे त्याला प्लेयिंग इलेव्हनमध्ये ठेवणं गरजेचं आहे, असं पठाण म्हणाला. तो स्टार स्पोर्ट्ससोबत बोलत होता. रोहित आणि केएल राहुल ओपनिंग करतील, असंही पठाणने सांगितलं. वर्ल्ड कपमध्ये चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरऐवजी सूर्यकुमार यादव खेळेल, तर ऑलराऊंडर हार्दिक पांड्या असेल. विकेट कीपर म्हणून दिनेश कार्तिक मैदानात उतरेल. यानंतर रवींद्र जडेजा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर बॉलिंगची जबाबदारी असेल, अशी प्रतिक्रिया इरफान पठाणने दिली. इरफान पठाणची वर्ल्ड कपची प्लेयिंग इलेव्हन केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: T20 world cup, Team india

    पुढील बातम्या