अबु धाबी, 18 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) रविवारपासून सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी ऐतिहासिक कामगिरीची नोंद झाली आहे. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात आयर्लंडच्या (Ireland vs Netherland) कुर्तीस कॅम्फरने (Curtis Campher) 4 बॉलमध्ये 4 विकेट घेतल्या. मॅचच्या 10 व्या ओव्हरमध्ये कुर्तीसने नेदरलँड्सच्या 4 खेळाडूंना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
10 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला कुर्तीसने ऍकरमनला 11 रनवर आऊट केलं. यानंतर पुढच्या बॉलला रेयान टेनडसकाटे शून्य रनवर एलबीडब्ल्यू झाला. स्कॉट एडवर्ड्सलाही एलबीडब्ल्यू करत कुर्तीसने या टी-20 वर्ल्ड कपमधली पहिली हॅट्रिक पूर्ण केलं. 10 व्या ओव्हरच्या पाचव्या बॉलला रुलॉफ व्हेन्डरमरवा बोल्ड झाला आणि कुर्तीसच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद झाली.
Curtis Campher has four in four 👏 ☝️ Colin Ackermann ☝️ Ryan ten Doeschate ☝️ Scott Edwards ☝️ Roelof van der Merwe#T20WorldCup | #IREvNED | https://t.co/TRm5wxuxrO pic.twitter.com/1HvjCUNR38
— T20 World Cup (@T20WorldCup) October 18, 2021
टी-20 इतिहासामध्ये चार बॉलमध्ये चार विकेट घेणारा कुर्तीस कॅम्फर तिसरा बॉलर ठरला आहे. याआधी अफगाणिस्तानचा राशीद खान आणि श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने हा विक्रम केला होता. मलिंगाच्या नावावर वनडेमध्येही अशाच विक्रमाची नोंद आहे. 2007 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मलिंगाने लागोपाठ 4 बॉलला 4 विकेट घेतल्या होत्या.
याआधी टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्याच दिवशी मोठा उलटफेर पाहायला मिळाला. स्कॉटलंडच्या टीमने कागदावर बलाढ्य वाटणाऱ्या बांगलादेशचा 6 रनने पराभव केला.
T20 World Cup मध्ये पहिल्याच दिवशी मोठा Upset, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडला हरवणाऱ्या बांगलादेशला धक्का
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: T20 world cup