• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup : हार्दिक-वरुणसाठी Bad News, टीम इंडियाचीही चिंता वाढणार

T20 World Cup : हार्दिक-वरुणसाठी Bad News, टीम इंडियाचीही चिंता वाढणार

टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपमधला (T20 World Cup) आपला पहिला सामना 24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) खेळला होता.

 • Share this:
  दुबई, 31 ऑक्टोबर : टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपमधला (T20 World Cup) आपला पहिला सामना 24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) खेळला होता. पहिल्या 7 दिवसांमध्ये भारताची फक्त एकच मॅच झाली, पण पुढच्या 15 दिवसांमध्ये टीम इंडियाला 6 मॅच खेळायला लागू शकतात. खेळाडूंसाठी फिटनेसच्या दृष्टीने ही मोठी समस्या असेल. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) यांचा फिटनेस सध्या खराब आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी आणि टीम इंडियासाठी (Team India) ही चिंतेची गोष्ट असेल. भारतीय टीमचा आज दुसरा मुकाबला न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) होत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. पाकिस्तानने या सगळ्या मॅच जिंकल्यामुळे त्यांचं सेमी फायनलचं स्थान निश्चित झालं आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा आणि हरभजन सिंग यांनीही यावर प्रश्न उपस्थित केले. एक आठवड्याचं अंतर फार चांगलं नाही, असं आकाश चोप्रा स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला. एक टीम तीन मॅच खेळून सेमी फायनलच्या दिशेने चालली आहे, तर दुसऱ्या टीमचा फक्त एकच सामना झाला आहे. पराभवानंतर वाट बघणं कठीण असतं, असं वक्तव्य आकाश चोप्राने केलं. तर चार-पाच दिवसांनी मॅच होणं गरजेचं आहे, त्यामुळे खेळाडूंची लय कायम राहते, अशी प्रतिक्रिया हरभजन सिंगने दिली. टीम इंडियाचा 31 ऑक्टोबरला दुसरा सामना खेळत आहेत. सुपर-12 मध्ये यानंतर टीम इंडियाच्या आणखी तीन मॅच होतील. जर भारतीय टीम सेमी फायनल आणि फायनलमध्ये पोहोचली तर त्यांना एकूण 6 मॅच खेळाव्या लागतील. टी-20 वर्ल्ड कपची फायनल 14 नोव्हेंबरला होणार आहे. 31 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या 15 दिवसांमध्येच सगळ्या मॅच होणार आहेत. भारतीय खेळाडू इंग्लंड दौरा आणि मग आयपीएल खेळून टी-20 वर्ल्ड कपसाठी आले आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी फिटनेस मोठी समस्या ठरू शकते. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती आणि हार्दिक पांड्या आधीपासूनच फिट नाहीत. वरुण तर इंजक्शन घेऊन खेळण्यासाठी उतरत आहे, असं सांगितलं जात आहे. 8 टीमच्या 3-3 मॅच झाल्या टीम इंडियाने स्पर्धेत फक्त एकच सामना खेळला असला तरी सुपर-12 मधल्या 12 पैकी 8 टीमच्या आतापर्यंत 3-3 मॅच झाल्या आहेत. यात ग्रुप-1 मधल्या 6 टीम इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि बांगलादेशचा समावेश आहे. ग्रुप-2 मध्ये पाकिस्तानच्याही 3 मॅच खेळून झाल्या. अफगाणिस्तानची टीम आज नामिबियाविरुद्ध तिसरा सामना खेळली. फक्त भारत आणि न्यूझीलंड यांच्या एक-एक मॅच झाल्या आहेत.
  Published by:Shreyas
  First published: