• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup : ...तर सेमी फायनलमध्ये भारत या टीमशी भिडणार!

T20 World Cup : ...तर सेमी फायनलमध्ये भारत या टीमशी भिडणार!

टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सुपर-12 स्टेजचा अखेरचा टप्पा सुरू झाला असला, तरी अजूनही सेमी फायनलच्या (T20 World Cup Semi Final) चारही टीम ठरलेल्या नाहीत.

 • Share this:
  दुबई, 7 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सुपर-12 स्टेजचा अखेरचा टप्पा सुरू झाला असला, तरी अजूनही सेमी फायनलच्या (T20 World Cup Semi Final) चारही टीम ठरलेल्या नाहीत. शनिवारी झालेल्या इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका (South Africa vs England) यांच्यातल्या सामन्यानंतर सेमी फायनलचं चित्र थोडंफार निश्चित झालं. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला असला तरी त्यांना सेमी फायनलमध्ये पोहोचता आलं नाही. पहिल्या ग्रुपमधून इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलियाची (Australia) टीम सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे. तर दुसऱ्या ग्रुपमधून पाकिस्तानला (Pakistan) सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळाला. सेमी फायनलच्या चौथ्या टीमसाठी आता भारत (Team India), न्यूझीलंड (New Zealand) आणि अफगाणिस्तान (Afghanistan) यांच्यात स्पर्धा आहे. याचा निकाल रविवारी होणाऱ्या न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान (New Zealand vs Afghanistan) यांच्यातल्या मॅचने लागेल. या सामन्यात अफगाणिस्तानचा विजय झाला आणि सोमवारी भारताने नामिबियाला हरवलं तर टीम इंडिया सेमी फायनलमध्ये प्रवेश करणारी चौथी टीम ठरेल. दुसरीकडे न्यूझीलंडला या सामन्यात विजय मिळाला तर ते थेट सेमी फायनलला पोहोचतील. भारताचा सामना कोणाशी? पहिल्या ग्रुपमधल्या सेमी फायनलच्या टीम निश्चित झाल्यामुळे आता कोणाची सेमी फायनल कोणाविरुद्ध होणार, हेदेखील स्पष्ट होत चाललं आहे. पहिल्या ग्रुपमधून इंग्लंड पहिल्या आणि ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. दुसऱ्या ग्रुपमध्ये पाकिस्तानचा सामना स्कॉटलंडविरुद्ध होणार आहे. पाकिस्तानी टीमचा फॉर्म आणि स्कॉटलंडची दुबळी टीम बघता या सामन्यात पाकिस्तानचा विजय जवळपास निश्चित आहे. या सामन्यात पाकिस्तानचा विजय झाला तर ते पहिल्या क्रमांकावर राहतील. स्कॉटलंडविरुद्ध विजय मिळाल्यास पाकिस्तानच्या खात्यात 5 मॅचमध्ये 5 विजय होतील, त्यामुळे ते पहिल्या क्रमांकावर राहतील. पाकिस्तानची टीम पहिल्या क्रमांकावर राहिल्यास दुसऱ्या ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानासाठी लढत असेल. म्हणजेच न्यूझीलंड किंवा भारताची टीम या ग्रुपमधून दुसऱ्या क्रमांकावर राहिल. सेमी फायनलचा सामना A1 vs B2 आणि B1 vs A2 असा होणार आहे. पहिल्या ग्रुपमधून इंग्लंडची टीम पहिल्या क्रमांकावर राहिल्यामुळे भारत किंवा न्यूझीलंड यांचा सामना इंग्लंडविरुद्ध (India vs England) होईल, तर पाकिस्तानची गाठ ऑस्ट्रेलियाशी (Pakistan vs Australia) होईल. भारत किंवा न्यूझीलंड यांची इंग्लंडविरुद्धची सेमी फायनल 10 नोव्हेंबरला अबु धाबीमध्ये होईल. तसंच स्कॉटलंडविरुद्ध पाकिस्तानचा विजय झाला तर त्यांची ऑस्ट्रेलियाविरुद्धची सेमी फायनल 11 नोव्हेंबरला दुबईमध्ये होईल. रविवार 14 नोव्हेंबरला वर्ल्ड कपची फायनल दुबईमध्ये खेळवली जाईल.
  Published by:Shreyas
  First published: