मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup : वाढदिवसालाच विराटच्या फेवरेट खेळाडूला धक्का, बुमराहने केला विक्रम

T20 World Cup : वाढदिवसालाच विराटच्या फेवरेट खेळाडूला धक्का, बुमराहने केला विक्रम

टी-20 वर्ल्ड कपमधले (T20 World Cup) पहिले दोन्ही सामने गमावल्यानंतर टीम इंडियाला (Team India) अखेर सूर गवसला आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) नावावर विक्रमाची नोंद झाली आहे.

टी-20 वर्ल्ड कपमधले (T20 World Cup) पहिले दोन्ही सामने गमावल्यानंतर टीम इंडियाला (Team India) अखेर सूर गवसला आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) नावावर विक्रमाची नोंद झाली आहे.

टी-20 वर्ल्ड कपमधले (T20 World Cup) पहिले दोन्ही सामने गमावल्यानंतर टीम इंडियाला (Team India) अखेर सूर गवसला आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) नावावर विक्रमाची नोंद झाली आहे.

दुबई, 5 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमधले (T20 World Cup) पहिले दोन्ही सामने गमावल्यानंतर टीम इंडियाला (Team India) अखेर सूर गवसला आहे. अफगाणिस्तानचा 66 रनने पराभव केल्यानंतर भारताने स्कॉटलंडला (India vs Scotland) फक्त 39 बॉलमध्ये धूळ चारली. स्कॉटलंडने दिलेले 86 रनचं आव्हान भारताने 6.3 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून पार केलं. केएल राहुलने 19 बॉलमध्ये 50 तर रोहित शर्माने 16 बॉलमध्ये 30 रन केले. विराट कोहलीला (Virat Kohli) त्याच्या वाढदिवशी टीम इंडियाने हे मोठं गिफ्ट दिलं आहे.

या सामन्यात विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतल्यानंतर भारताने स्कॉटलंडचा 85 रनवर ऑल आऊट केला. मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या, तर जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) 2 विकेट घेण्यात यश आलं. बुमराहने 3.4 ओव्हरमध्ये 10 रन देऊन या दोन विकेट मिळवल्या, सोबतच त्याने युझवेंद्र चहलचा (Yuzvendra Chahal) विक्रमही मोडीत काढला.

जसप्रीत बुमराह टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे. 54 सामन्यांमध्ये बुमराहच्या नावावर 64 विकेट झाल्या आहेत. युझवेंद्र चहलने 49 मॅचमध्ये 63 विकेट घेतल्या. साडेचार वर्षांनी टीम इंडियात पुनरागमन करणारा आर.अश्विन या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अश्विनच्या नावावर 48 मॅचमध्ये 55 विकेट आहेत. तर भुवनेश्वर कुमारने 52 मॅचमध्ये 50 आणि रविंद्र जडेजाने 54 मॅचमध्ये 43 विकेट मिळवल्या. 2016 साली जसप्रीत बुमराहने टीम इंडियात पदार्पण केलं, यानंतर काही दिवसांमध्येच तो टीमचा तिन्ही फॉरमॅटमधला प्रमुख बॉलर झाला.

यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक झाली. पाकिस्तानविरुद्ध 10 विकेटने आणि न्यूझीलंडविरुद्ध 8 विकेटने पराभव झाल्यानंतर भारताने अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडला लोळवलं. पण पहिल्या दोन पराभवांमुळे टीम इंडियाचं सेमी फायनलला पोहोचणं अवघड झालं आहे. आता रविवार 7 नोव्हेंबरला अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला तरच टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहोचू शकते.

First published:
top videos

    Tags: Jasprit bumrah, T20 world cup, Team india, Virat kohli, Yuzvendra Chahal