मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : 'तारीख बदल देंगे' म्हणणाऱ्या पाकिस्तानी अँकरची सेहवागने केली बोलती बंद!

T20 World Cup : 'तारीख बदल देंगे' म्हणणाऱ्या पाकिस्तानी अँकरची सेहवागने केली बोलती बंद!

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भारताचा पहिला सामना 24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) होणार आहे. भारताला पाकिस्तानविरुद्ध एवढं यश का मिळालं, याचं कारण वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) सांगितलं आहे.

    मुंबई, 19 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भारताचा पहिला सामना 24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) होणार आहे. टी-20 आणि वनडे वर्ल्ड कपमधलं भारताचं पाकिस्तानविरुद्धचं रेकॉर्ड शानदार आहे. वर्ल्ड कपमध्ये भारताचा कधीच पाकिस्तानविरुद्ध पराभव झाला नाही. टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानविरुद्धच्या सगळ्या 5 मॅच जिंकल्या आहेत. भारताला पाकिस्तानविरुद्ध एवढं यश का मिळालं, याचं कारण वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) सांगितलं आहे. सेहवागने एबीपी न्यूजवर पाकिस्तानी न्यूज अँकरने केलेल्या तारीख बदल देंगे या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय टीम दबावाची परिस्थिती चांगल्या प्रकारे सांभाळते, असं सेहवाग म्हणाला. 'भारत-पाकिस्तान सामन्याआधी आम्ही कधीच मोठी वक्तव्य करत नाही. पाकिस्तानकडून मात्र कायमच मोठमोठी वक्तव्य केली जातात, जसं हा कार्यक्रम सुरू होण्याआधी पाकिस्तानी न्यूज अँकर तारीख बदल देंगे म्हणाले होते. भारताकडून कधीच अशी वक्तव्य केली जात नाहीत, कारण आम्ही तयारी चांगली करतो. जेव्हा तुम्ही चांगली तयारी करता, तेव्हा निकाल काय असू शकतो, ते तुम्हाला आधीपासून माहिती असतं. 2003 आणि 2011 वर्ल्ड कपमध्ये आम्ही कमी दबावात होतो,' असं सेहवागने सांगितलं. पाकिस्तानकडे भारताला हरवण्याची संधी आहे, असंही सेहवाग म्हणाला. 'हा फॉरमॅट बघितला तर पाकिस्तानला भारताला हरवण्याची जास्त संधी असते, कारण 50 ओव्हरच्या फॉरमॅटमध्ये ते चांगलं खेळत नाहीत. या छोट्या फॉरमॅटमध्ये एक खेळाडूही दुसऱ्या टीमला हरवू शकतो. तरीही पाकिस्तानला अजूनपर्यंत असं करता आलेलं नाही. 24 तारखेला काय होतं ते पाहू,' अशी प्रतिक्रिया सेहवागने दिली. वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताचा पाकिस्तानविरुद्धचं रेकॉर्ड 7-0 असं आहे. पण 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs Pakistan, T20 world cup, Virender sehwag

    पुढील बातम्या