मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : IND vs PAK सामन्याआधी विराटला वाटतेय फक्त एकाच गोष्टीची भीती

T20 World Cup : IND vs PAK सामन्याआधी विराटला वाटतेय फक्त एकाच गोष्टीची भीती

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडिया आपल्या मोहिमेची सुरुवात रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या (India vs Pakistan) सामन्याने करणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) भीती व्यक्त केली आहे.

  • Published by:  Shreyas

दुबई, 23 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडिया आपल्या मोहिमेची सुरुवात रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या (India vs Pakistan) सामन्याने करणार आहे. अनेक क्रिकेटप्रेमी युएईमधल्या खेळपट्टीमुळे चिंतेत आहेत, कारण नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये रन करणं कठीण झालं होतं. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टी-20 वर्ल्ड कपमध्ये तरी आयपीएलपेक्षा चांगल्या खेळपट्ट्या असतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

आयपीएलमध्ये (IPL 2021) आरसीबीचं (RCB) नेतृत्व केलेल्या विराटला प्रत्येक प्रकारच्या खेळपट्ट्यांवर खेळण्याचा अनुभव आहे. आयपीएलदरम्यान वर्ल्ड कपच्या खेळपट्ट्यांसाठीचं काम सुरू होतं. आता मात्र खेळपट्ट्या चांगल्या असतील, असं विराट म्हणाला. आयपीएल फायनल बघितल्यानंतर वर्ल्ड कपसाठीची खेळपट्टी चांगली असेल, असं मला वाटत असल्याची प्रतिक्रिया विराटने दिली.

'आयसीसी स्पर्धा असल्यामुळे खेळपट्टीचा मापदंड एका स्तराचा असेल, याची मला खात्री आहे. जशी स्पर्धा पुढे सरकेल तशी धुक्याची भूमिकाही महत्त्वाची ठरेल. धुक्यामुळे खेळपट्टीही चांगली राहण्यासाठी मदत होईल. अबु धाबी आणि दुबईची खेळपट्टी जास्त चांगली असेल. शारजाहमध्ये मात्र खेळपट्टी संथ राहिल आणि बॉललाही फार बाऊन्स मिळणार नाही. मी स्वत: जास्त स्कोअरच्या मॅचची अपेक्षा करत नाही,' असं विराट कोहलीने सांगितलं.

हार्दिक खेळणार का नाही?

विराट कोहली (Virat Kohli) याने हार्दिक पांड्याबद्दलच्या प्रश्नावर उत्तर दिलं. हार्दिक बॉलिंग करो अथवा न करो तो टीम इंडियाचा मॅच विनर आहे, असं विराट म्हणाला आहे. विराटच्या या वक्तव्यामुळे हार्दिक बॅटर म्हणूनच खेळणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.

'आम्ही सहाव्या क्रमांकावर बॅटिंग करणारा खेळाडू एका रात्रीत तयार करू शकत नाही. मी कायमच हार्दिकला पाठिंबा दिला आहे. ऑस्ट्रेलियात त्याने कशी कामगिरी केली, ते आपण बघितलं. मी बॅटर म्हणून हार्दिकला टीममध्ये ठेवलं. तो असा बॅटर आहे जो विरोधी टीमच्या हातातून मॅच खेचून आणू शकतो. तो आमचा मॅच विनर आहे. टी-20 मध्ये तुम्हाला अशा खेळाडूची गरज असते,' अशी प्रतिक्रिया विराट कोहलीने दिली.

हार्दिक पांड्याचा फिटनेस प्रत्येक दिवशी चांगला होत आहे, तो लवकरच बॉलिंगला सुरुवात करेल, अशी अपेक्षा विराटने व्यक्त केली. स्पर्धेमध्ये नंतर तो कमीत कमी 2 ओव्हर बॉलिंग नक्कीच करेल. पण सध्या तो ज्या गोष्टी करू शकत नाही, त्याबद्दल दबाव टाकण्यात काहीच अर्थ नाही, असं वक्तव्य विराटने केलं.

First published:

Tags: India vs Pakistan, T20 world cup, Virat kohli