Home /News /sport /

T20 World Cup : शमीचा धर्म काढणाऱ्यांवर विराट संतापला, ट्रोलर्सच्या टीकेवर कॅप्टनचा खणखणीत स्ट्रेट ड्राईव्ह

T20 World Cup : शमीचा धर्म काढणाऱ्यांवर विराट संतापला, ट्रोलर्सच्या टीकेवर कॅप्टनचा खणखणीत स्ट्रेट ड्राईव्ह

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा (India vs Pakistan) 10 विकेटने दारूण पराभव झाला. या पराभवानंतर काही ट्रोलर्सनी भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीवर (Mohammad Shami Trolling) निशाणा साधला.

पुढे वाचा ...
    दुबई, 30 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा (India vs Pakistan) 10 विकेटने दारूण पराभव झाला. या पराभवानंतर काही ट्रोलर्सनी भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीवर (Mohammad Shami Trolling) निशाणा साधला. मोहम्मद शमीने मॅच फिक्सिंग केल्याचे आरोप करण्यात आले, तसंच त्याचा धर्मही काढण्यात आला. मोहम्मद शमीवर झालेल्या या टीकेनंतर अनेक क्रिकेटपटू आणि सेलिब्रिटींनी मोहम्मद शमीला पाठिंबा दिला. आता टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनेही (Virat Kohli) या प्रकरणावर मौन सोडलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी विराट कोहलीने या ट्रोलर्सवर निशाणा साधला आहे. 'खूप लोक सोशल मीडियावर आपली ओळख लपवतात आणि खेळाडूंना ट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. हे खूप खालच्या पातळीचं आहे. त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी असते, म्हणून हा ड्रामा केला जातो. खेळाडूचं समर्थन कसं करायचं ते आम्हाला माहिती आहे. सोशल मीडिया ट्रोलिंग आणि बाहेरच्या आवाजांचं आमच्यासाठी काहीही महत्त्व नाही,' असं विराट कोहली म्हणाला. '...तर मी मृत्यूला पसंत करेन', ट्रोलिंगनंतर Mohammed Shami चा 'तो' Video व्हायरल पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 151 रन केले. विराट कोहलीच्या अर्धशतकाशिवाय इतर खेळाडू अपयशी ठरले. पाकिस्तानने 17.5 ओव्हरमध्येच हे आव्हान पार केलं. मोहम्मद शमीने या सामन्यात 3.5 ओव्हरमध्ये 43 रन दिले. मोहम्मद शमीनं पाकिस्तानच्या इनिंगमध्ये 18 व्या ओव्हरमध्ये बॉलिंग केली. तो बॉलिंगला आला तेव्हा पाकिस्तानला विजयासाठी 17 रनची आवश्यकता होती. पाकिस्ताननं 5 बॉलमध्येच हे रन पूर्ण करत टीम इंडियाला पराभूत केलं. त्यानंतर काही फॅन्सनी शमीवर टीका करत त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. T20 World Cup: Online Trolling चं लक्ष्य झाल्यानंतर मोहम्मद शमीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला... टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा पुढचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. 31 ऑक्टोबरला संध्याकाळी 7.30 वाजता या मॅचला सुरुवात होईल. भारत आणि न्यूझीलंडने स्पर्धेतले आपले पहिले सामने पाकिस्तानविरुद्धच गमावले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पराभव झाला तर टीम इंडियासाठी सेमी फायनल गाठणं कठीण होऊन बसेल. टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि न्यूझीलंड दोन वेळा आमने सामने आले आहेत. 2007 आणि 2016 साली दोन्ही टीममध्ये टी-20 वर्ल्ड कपमध्ये मॅच झाली, या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. शामीसाठी धावला पाकिस्तानी बॅट्समन, पण 'या' मुद्द्यावरुन युजर्सनी त्यालाच केलं 'Run-out'
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs Pakistan, T20 world cup, Virat kohli

    पुढील बातम्या