मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup IND vs PAK : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात या शिलेदारांवर विराटचा विश्वास, भारताची Playing XI

T20 World Cup IND vs PAK : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात या शिलेदारांवर विराटचा विश्वास, भारताची Playing XI

Team India

Team India

भारताविरुद्धच्या महामुकाबल्यात पाकिस्तानचा (India vs Pakistan) कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) अनपेक्षित असे कोणतेही बदल केले नाहीत.

  • Published by:  Shreyas

दुबई, 24 ऑक्टोबर : भारताविरुद्धच्या महामुकाबल्यात पाकिस्तानचा (India vs Pakistan) कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) अनपेक्षित असे कोणतेही बदल केले नाहीत. आर.अश्विन, इशान किशन, राहुल चहर आणि शार्दुल ठाकूर या चौघांना प्लेयिंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. पाकिस्तानविरुद्धच्या या महत्त्वाच्या सामन्यात विराट कोहलीने वरुण चक्रवर्ती या मिस्ट्री स्पिनरवर आणि फिटनेसमुळे चर्चेत आलेल्या हार्दिक पांड्यावर विश्वास दाखवला आहे.

आयपीएल 2021 मध्ये वरुण चक्रवर्तीने धमाकेदार कामगिरी केली, त्याच्या या कामगिरीमुळे केकेआरने फायनलमध्ये प्रवेश मिळवला, पण वरुण चक्रवर्तीलाही फिटनेसच्या समस्येनं ग्रासलं आहे. आयपीएलमध्ये वरुण गुडघ्याच्या दुखापतीमुळे इंजक्शन घेऊन खेळत होता.

दुसरीकडे हार्दिक पांड्याही 2019 नंतर फारशी बॉलिंग करत नाही. पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर हार्दिकचं बॉलिंग करणं कमी झालं आहे. विराट कोहलीने मात्र हार्दिक पांड्याचा बचाव केला आहे. हार्दिक पांड्या हा मॅच विनर आहे, त्यामुळे तो टीममध्ये असल्याचं विराट म्हणाला. विराटच्या या वक्तव्यामुळे हार्दिक या मॅचमध्येही बॉलिंग करणार नाही, हे स्पष्ट झालं आहे.

भारतीय टीम

केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत टी-20 वर्ल्ड कपमध्ये 5 मॅच झाल्या, यातल्या पाचही सामन्यांमध्ये टीम इंडियाचा विजय झाला. तर वनडे वर्ल्ड कपमध्येही पाकिस्तानने भारताला एकदाही पराभूत केलं नाही. आता आजच्या सामन्यात हे रेकॉर्ड अबाधित राहणार का पाकिस्तान हे रेकॉर्ड मोडणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

भारताचे वेळापत्रक (Team India Schedule)

24 ऑक्टोबर- भारत विरुद्ध पाकिस्तान सायंकाळी 7: 30 वाजता

31 ऑक्टोबर- भारत विरुद्ध न्यूझीलंड सायंकाळी 7: 30 वाजता

3 नोव्हेंबर- भारत विरुद्ध अफगाणिस्तान सायंकाळी 7: 30 वाजता

5 नोव्हेंबर- भारत विरुद्ध स्कॉटलंड सायंकाळी 7: 30 वाजता

8 नोव्हेंबर- भारत विरुद्ध नामिबिया सायंकाळी 7: 30 वाजता

First published:

Tags: Babar azam, India vs Pakistan, T20 world cup, Virat kohli