• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • T20 World Cup : भारताच्या ओपनरना पाकिस्तानी बॉलरकडून धोका, पहिल्याच ओव्हरमध्ये करतो हल्ला!

T20 World Cup : भारताच्या ओपनरना पाकिस्तानी बॉलरकडून धोका, पहिल्याच ओव्हरमध्ये करतो हल्ला!

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातल्या महामुकाबल्याला (T20 World Cup) आता अवघ्या काही वेळात सुरुवात होणार आहे. टीम इंडियाची कामगिरी ओपनर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) यांच्यावर अवलंबून आहे.

  • Share this:
    दुबई, 24 ऑक्टोबर : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातल्या महामुकाबल्याला (T20 World Cup) आता अवघ्या काही वेळात सुरुवात होणार आहे. टीम इंडियाची कामगिरी ओपनर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) यांच्यावर अवलंबून आहे. पॉवर प्लेमध्ये जास्त रन करण्याचा या दोघांचा प्रयत्न असेल. पण या दोघांना पाकिस्तानच्या एका फास्ट बॉलरपासून सावध राहावं लागणार आहे. डावखुरा फास्ट बॉलर शाहिन आफ्रिदी (Shaheen Afridi) बड्या बड्या ओपनरची बोलती बंद करू शकतो. फक्त 21 वर्षांच्या या ओपनरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आहे. भारतालाही त्याच्यापासून सावध राहावं लागणार आहे. शाहिन आफ्रिदीनकडे 19 टेस्ट, 28 वनडे आणि 30 टी-20 मॅचचा अनुभव आहे. पाकिस्तानचे अनेक चाहते शाहिनची तुलना वसीम अक्रम (Wasim Akram) आणि मोहम्मद आमीरशी (Mohammad Amir) करतात. पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) मिकी आर्थर यांनी शाहिनची तुलना ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कशी केली होती. एवढ्या कमी अनुभवामध्ये शाहिन आफ्रिदीने आपल्या जलद आणि अचूक बॉलिंगने अनेक बड्या खेळाडूंना हैराण केलं. 6 फूट 6 इंचांचा शाहिन आफ्रिदी टी-20 क्रिकेटमध्ये पहिल्या ओव्हरचा बादशाह आहे. फेब्रुवारी 2018 साली टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शाहिनने 61 इनिंगमध्ये 20 वेळा पहिल्या ओव्हरमध्येच विकेट घेतली आहे. एवढच नाही तर त्याने एकदा पहिल्याच ओव्हरमध्ये दोन विकेटही मिळवल्या आहेत. म्हणजेच पहिल्या ओव्हरमध्ये शाहिनला आतापर्यंत 21 विकेट मिळाल्या आहेत. या रेकॉर्डमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा इमाद वसीम आहे. इमादने पहिल्या ओव्हरमध्ये 13 विकेट मिळवल्या. हे रेकॉर्ड बघून शाहिन आफ्रिदी इतर खेळाडूंपेक्षा किती धोकादायक आहे, ते लक्षात येतं. शाहिन आफ्रिदीच्या यॉर्करचा सामना करणं कित्येकवेळा खेळाडूंसाठी त्रासदायक ठरतं. शाहिन आफ्रिदीला भारताविरुद्ध फक्त एकच सामना खेळायला मिळाला आहे. 2018 साली आशिया कपवेळी शाहिन भारताविरुद्ध खेळला होता, त्यावेळी त्याने 6 ओव्हर बॉलिंग केली, पण त्याला एकही विकेट मिळाली नाही. रोहितने शाहिनच्या बॉलिंगवर फोर आणि सिक्स मारून त्याचा आत्मविश्वास खच्ची केला. दोन वर्षांनंतर मात्र शाहिन अनुभवी आणि परिपक्व झाला आहे, त्यामुळे यावेळी मुकाबला तगडा होण्याची शक्यता आहे.
    Published by:Shreyas
    First published: