• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup : India vs Pakistan सामन्याचा 'विखार', वैतागलेल्या Sania Mirza ने घेतला टोकाचा निर्णय

T20 World Cup : India vs Pakistan सामन्याचा 'विखार', वैतागलेल्या Sania Mirza ने घेतला टोकाचा निर्णय

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध (India vs Paksitan) होणार आहे. 24 ऑक्टोबर म्हणजेच रविवारी संध्याकाळी हा महामुकाबला रंगेल, पण या सामन्याआधी सानिया मिर्झाने (Sania Mirza) मोठा निर्णय घेतला आहे.

 • Share this:
  दुबई, 20 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध (India vs Paksitan) होणार आहे. 24 ऑक्टोबर म्हणजेच रविवारी संध्याकाळी हा महामुकाबला रंगेल, पण या सामन्याआधी सानिया मिर्झाने (Sania Mirza) मोठा निर्णय घेतला आहे. भारताची स्टार टेनिसपटू असलेल्या सानिया मिर्झाने पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत (Shoaib Malik) लग्न केलं. यानंतर अनेकवेळा खासकरून भारत-पाकिस्तान मॅचवेळी सानिया मिर्झावर सोशल मीडियावरून (Social Media) विखारी टीका करण्यात आली. यानंतर आता भारत-पाकिस्तान सामन्याआधी सानिया मिर्झाने सोशल मीडियापासून लांब जायचा निर्णय घेतला आहे. सानिया मिर्झाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. भारत-पाकिस्तान मॅचच्या दिवशी आपण सोशल मीडिया आणि विषारीपणापासून लांब राहणार आहे, असं तिने या व्हिडिओमध्ये म्हणलं आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

  भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) यानेही तिच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. बाय, गूड आयडिया अशी प्रतिक्रिया युवराजने या व्हिडिओला दिली. Yuvraj Singh backing Sania Mirza. (Source: Instagram) भारत-पाकिस्तान सामन्याबाबत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनेही प्रतिक्रिया दिली. हा सामना आमच्यासाठी दुसऱ्या मॅचप्रमाणेच असणार आहे, असं विराट म्हणाला. तर आमची टीम भारताला हरवू शकते, असा विश्वास पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने व्यक्त केला. आतापर्यंत वनडे आणि टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने कधीच भारताचा पराभव केलेला नाही. दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्ये वारंवार होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे भारत-पाकिस्तान सामना होऊ नये अशी मागणी जोर धरू लागली आहे. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग, रामदास आठवले आणि एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भारत-पाकिस्तान सामन्याला विरोध केला आहे. तर आम आदमी पक्षानेही भारत-पाकिस्तान मॅच होऊ नये, अशी मागणी केली आहे. T20 World Cup : भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळायला नकार दिला तर... काय आहे ICC चा नियम? बीसीसीआयने मात्र हा सामना खेळवला जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. 'काश्मीरमध्ये घडणाऱ्या हत्या दुःखद आहेत, आम्ही त्याचा निषेध करतो. जो भारत-पाकिस्तान सामन्याचा प्रश्न आहे, तो आयसीसीच्या (ICC) आंतरराष्ट्रीय कराराअंतर्गत आहे, ज्यामध्ये आम्ही कोणत्याही देशासोबत खेळण्यास नकार देऊ शकत नाही. आयसीसी स्पर्धा खेळाव्या लागतील', असं बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले.
  Published by:Shreyas
  First published: