मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : भारत-पाकिस्तान सामन्याला सर्वाधिक डिमांड, तिकीट 333 पट महाग!

T20 World Cup : भारत-पाकिस्तान सामन्याला सर्वाधिक डिमांड, तिकीट 333 पट महाग!

टी-20 वर्ल्ड कपला ( T20 World Cup) आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे आयसीसीने 3 ऑक्टोबरपासून स्पर्धेच्या तिकीट विक्रीला सुरुवात केली आहे. पण भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यासाठीच्या तिकीटाला सर्वाधिक मागणी आहे, ज्यामुळे तिकीटाची किंमतही प्रचंड ठेवण्यात आली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

दुबई, 4 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपला ( T20 World Cup) आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे आयसीसीने 3 ऑक्टोबरपासून स्पर्धेच्या तिकीट विक्रीला सुरुवात केली आहे. वर्ल्ड कपसाठी 70 टक्के प्रेक्षक स्टेडियममध्ये जायला युएईमध्ये परवानगी देण्यात आली आहे, पण भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यासाठीच्या तिकीटाला सर्वाधिक मागणी आहे, ज्यामुळे तिकीटाची किंमतही प्रचंड ठेवण्यात आली आहे. युएईमध्ये टी-20 वर्ल्ड कपची मॅच बघण्यासाठी तिकीटाचा दर 600 रुपये ठेवण्यात आला आहे, पण भारत-पाकिस्तान मॅचसाठी हेच तिकीट 333 पट महाग मिळत आहे. चाहते https://www.t20worldcup.com/tickets वर जाऊन हे तिकीट खरेदी करू शकतात.

टी-20 वर्ल्ड कपला 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. भारताचा पहिलाच मुकाबला 24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध दुबईमध्ये होणार आहे. या मॅचसाठीचं तिकीट तब्बल 2 लाख रुपयांना मिळत आहे. म्हणजेच सामान्य मॅचपेक्षा या तिकीटाची किंमत 333 पट जास्त आहे. दुबईच्या स्टेडियममध्ये वेगवेगळ्या स्टॅण्डमधल्या तिकीटाची किंमत वेगवेगळी आहे. 12,500 रुपयांपासून या तिकीटांना सुरुवात होत आहे. याशिवाय 31,200 रुपये आणि 54,100 रुपयांना प्रीमियम आणि प्लॅटिनम स्टॅण्डमध्ये बघून मॅच बघता येणार आहे. या तिन्ही ठिकाणची तिकीटं संपली आहेत, पण भारत-पाकिस्तान मॅचच्या व्हीआयपी स्टॅण्ड आणि स्काय बॉक्सचे तिकीट दर अजून जाहीर करण्यात आलेले नाहीत. भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 31 ऑक्टोबरला होणाऱ्या व्हीआयपी स्टॅण्डचं तिकीट 1 लाख 96 हजारांच्या आसपास आहे, त्यामुळे भारत-पाकिस्तान मॅचच्या व्हीआयपी स्टॅण्डचे दर आणखी जास्त असण्याची शक्यता आहे.

भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या मॅचच्या तिकीटाचे कमीत कमी दर 10,400 रुपये आहेत.

टी-20 वर्ल्ड कपचा हा 7 वा मोसम आहे, या स्पर्धेत 16 टीम सहभागी होणार आहेत. याआधी 2016 साली भारतात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी वेस्ट इंडिजने दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. या वर्ल्ड कपला 17 ऑक्टोबरपासून ओमान विरुद्ध पपुआ न्यू गिनी या मॅचने मस्कटमधून सुरुवात होईल. याचदिवशी बांगलादेश आणि स्कॉटलंडची मॅचही होणार आहे. तर सुपर-12 मध्ये पहिला सामना ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेत 23 ऑक्टोबरला अबु धाबीमध्ये होईल. भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध 24 ऑक्टोबरला दुबईमध्ये खेळवला जाईल.

70 टक्के प्रेक्षकांना परवानगी

टी-20 वर्ल्ड कपसाठी स्टेडियममध्ये 70 टक्के प्रेक्षकांना यायला परवानगी देण्यात आली आहे. आयसीसी आणि स्पर्धेचं आयोजक असलेल्या बीसीसीआयला याची परवानगी युएई सरकारने दिली आहे. स्पर्धेची फायनल 14 नोव्हेंबरला खेळवली जाईल. या स्पर्धेचं आयोजन सुरुवातीला भारतात होणार होतं, पण कोरोना व्हायरसमुळे बीसीसीआयने स्पर्धा युएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला. स्पर्धेचं आयोजन मात्र बीसीसीआयने (BCCI) स्वत:कडे ठेवलं.

टीम इंडियाला 14 वर्षांपासून प्रतिक्षा

टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप 2007 साली जिंकला होता, यानंतर भारताला एकदाही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. 14 वर्षांची ही प्रतिक्षा संपवण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. या टी-20 वर्ल्ड कपनंतर विराट (Virat Kohli) टी-20 टीमचं नेतृत्व सोडणार आहे. याची घोषणा त्याने आधीच केली आहे. एमएस धोनीला (MS Dhoni) वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचं मेंटर करण्यात आलं आहे.

First published:

Tags: Icc, India vs Pakistan, T20 world cup, Team india