मुंबई, 20 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात 24 ऑक्टोबरला महामुकाबला होणार आहे. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (Champions Trophy 2017) विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानने (Pakistan Cricket Team) 2019 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2019) निराशाजनक कामगिरी केली. सरफराज अहमदच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पाकिस्तानवर त्यांचे चाहतेही नाराज झाले. सोशल मीडियावर पाकिस्तानी फॅन्सचे काही व्हिडिओ व्हायरल झाले, तसंच त्यांचे काही मीम्सही लोकप्रिय झाले. ब्रिटीश पाकिस्तानी चाहता मोमिन साकिब हा त्यातलाच एक. 2019 वर्ल्ड कपच्या भारत-पाकिस्तान सामन्याननंतर मोमिनने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला.
मॅनचेस्टरमध्ये भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वात पाकिस्तानचा 89 रनने पराभव केला. या पराभवानंतर मोमिनने सरफराजच्या पाकिस्तानी टीमवर जोरदार टीका केली. मोमिनचा मारो मुझे मारो (Maro Mujhe Maro) हा डायलॉगही भलताच लोकप्रिय झाला. आता पुन्हा एकदा टी-20 वर्ल्ड कपच्या भारत-पाकिस्तान सामन्याआधी मोमिनचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
View this post on Instagram
मोमिनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेयर केला, यात तो बाबर आझमच्या पाकिस्तान टीमवर बोलला, तसंच त्याला 2019 वर्ल्ड कपमधल्या पराभवाच्या आठवणींनी रडायलाही आलं. मोमिनचा हा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
2019 साली भारताविरुद्ध पराभव झाल्यानंतर मोमिनने पाकिस्तानी टीमच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. भारत-पाकिस्तानमधल्या महत्त्वाच्या सामन्याआधी पाकिस्तानचे खेळाडू बर्गर आणि पिझ्झा खात होते, असा आरोप मोमिनने केला होता.
Nailed it @mominsaqib and @Bilalbinsaqib .@azharjavaiduk very good interview. pic.twitter.com/VCVlUMdFpB
— Ibrahim Tariq Shafi (@IbrahimTShafi) June 16, 2019
पाकिस्तानची टीम 2019 वर्ल्ड कपच्या पहिल्या राऊंडमध्येच बाहेर झाली, तर भारतीय टीम सेमी फायनलपर्यंत पोहोचली होती. सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभवाचा धक्का दिला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs Pakistan, T20 world cup