मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup, IND vs PAK : 2017 ते 2021, 4 वर्ष 4 सामने, टीम इंडियाने पुन्हा केली तीच चूक

T20 World Cup, IND vs PAK : 2017 ते 2021, 4 वर्ष 4 सामने, टीम इंडियाने पुन्हा केली तीच चूक

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (India vs Pakistan) सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. शाहिन आफ्रिदीने (Shaheen Afridi) पहिल्या दोन ओव्हरमध्येच टीम इंडियाच्या दोन्ही ओपनरना माघारी धाडलं.

  • Published by:  Shreyas

दुबई, 24 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (India vs Pakistan) सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. शाहिन आफ्रिदीने (Shaheen Afridi) पहिल्या दोन ओव्हरमध्येच टीम इंडियाच्या दोन्ही ओपनरना माघारी धाडलं. पहिल्याच ओव्हरच्या चौथ्या बॉललाच शाहिन आफ्रिदीने रोहित शर्माला (Rohit Sharma) पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट केलं. यानंतर तिसऱ्या ओव्हरला पुन्हा शाहिनने फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहुलला (KL Rahul) बोल्ड केलं. पॉवर प्लेच्या शेवटच्या म्हणजेच सहाव्या ओव्हरला हसन अलीने (Hasan Ali) सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) आऊट केलं.

पाकिस्तानविरुद्धच्या या खराब कामगिरीनंतर टीम इंडियाचे खेळाडू आयसीसीच्या मागच्या 4 ट्रॉफीमधून काहीच शिकले नाहीत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आयसीसीच्या मागच्या चार स्पर्धांमध्ये डावखुऱ्या फास्ट बॉलरनी त्यांच्या स्विंग बॉलिंगवर टीम इंडियाला कायमच अडचणीत आणलं.

2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये (Champions Trophy Final) मोहम्मद आमीर (Mohammad Amir) या डावखुऱ्या बॉलरने आपल्या स्विंग बॉलिंगमुळे टीम इंडियाला धक्के दिले. या सामन्यात पाकिस्तानने टीम इंडियाचा पराभव केला. यानंतर 2019 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्येही (World Cup Semi Final 2019) ट्रेन्ट बोल्टने (Trent Boult) त्याच्या सहकाऱ्यांसह स्विंग बॉलिंगवरच टीम इंडियाला वर्ल्ड कपमधून बाहेर काढलं. काही महिन्यांपूर्वी झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्येही (WTC Final) न्यूझीलंडच्या ट्रेन्ट बोल्ट आणि नील वॅगनर (Niel Wagner) या दोन डावखुऱ्या स्विंग बॉलरसमोर भारताच्या बॅट्समनना संघर्ष करावा लागला होता. आता टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यामध्येही डावखुऱ्या स्विंग बॉलरनेच टीम इंडियाला अडचणीत आणलं.

First published:

Tags: India vs Pakistan, T20 world cup