मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : 'त्याला टीम इंडियात घेऊन चूक केली', इंझमामचे विराटच्या कॅप्टन्सीवरच प्रश्नचिन्ह

T20 World Cup : 'त्याला टीम इंडियात घेऊन चूक केली', इंझमामचे विराटच्या कॅप्टन्सीवरच प्रश्नचिन्ह

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भारताचा पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) दारुण पराभव झाला आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इंझमाम उल हक (Inzamam Ul Haq) याने तर विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टन्सीवरच प्रश्न उपस्थित केले आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

दुबई, 26 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भारताचा पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) दारुण पराभव झाला आहे. भारताने दिलेलं 152 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पार केलं. या सामन्यात टीम इंडियाची नेमकी कुठे चूक झाली, याबाबत क्रिकेट तज्ज्ञ आणि माजी क्रिकेटपटू वेगवेगळी मतं मांडत आहेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इंझमाम उल हक (Inzamam Ul Haq) याने तर विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टन्सीवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. या सामन्यात विराटने टीमची निवड करताना मोठी चूक केली. या सामन्यात हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) संधी देणं सगळ्यात मोठी चूक असल्याचं इंझमाम म्हणाला.

'भारताला सगळ्यात मोठा धक्का हार्दिक पांड्याला टीममध्ये घेतल्यामुळे लागला. भारताची निवड अजिबात योग्य नव्हती. दुसरीकडे बाबर आझमला आपल्या टीमचं संतुलन माहिती होतं,' असं वक्तव्य इंझमामने आपल्या युट्यूब चॅनलवर केलं.

'भारताला सहाव्या बॅट्समनची कमतरता जाणवली. जर भारत सहावा बॉलर घेऊन खेळला असता तर चांगलं झालं असतं. मोहम्मद हफीजला पाकिस्तानला केवढा फायदा झाला. इमाद वसीमने 4 ओव्हर बॉलिंग केल्यानंतर हफीजने दोन ओव्हर बॉलिंग केली. पाकिस्तानकडे शोएब मलिककडूनही बॉलिंग करून घेण्याचा पर्याय उपलब्ध होता,' असं इंझमामने सांगितलं.

हार्दिक पांड्याने पाकिस्तानविरुद्ध 8 बॉलमध्ये 11 रनची खेळी केली, यानंतर त्याला दुखापत झाली. न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचसाठी हार्दिक फिट असल्याचं वृत्त आता समोर आलं आहे. पाठीच्या दुखापतीमुळे हार्दिक पांड्याला मागच्या दोन वर्षांपासून ग्रासलं आहे. आयपीएलमध्येही हार्दिक पांड्याने बॉलिंग केली नाही, त्यामुळे सुरुवातीपासूनच पांड्याच्या निवडीबाबत आक्षेप घेण्यात येत आहेत.

पाकिस्तानविरुद्धच्या मॅचआधी विराट कोहलीने पांड्याचं कौतुक केलं होतं. 'आम्ही सहाव्या क्रमांकाचा खेळाडू एका रात्रीत तयार करू शकत नाही. मी कायमच पांड्याला पाठिंबा दिला आहे. ऑस्ट्रेलियात त्याने कशी कामगिरी केली, ते आपण सगळ्यांनी बघितलं. मी त्याला बॅट्समन म्हणून टीममध्ये ठेवलं. ते एक असा बॅट्समन आहे, जो विरोधी टीमकडून मॅच खेचून घेऊ शकतो. तो आमचा मॅच विनर आहे. टी-20 मध्ये असा बॅट्समनची गरज आहे,' असं विराट म्हणाला होता.

First published:

Tags: Hardik pandya, India vs Pakistan, T20 world cup, Virat kohli