• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup : भारत-पाकिस्तानचा महामुकाबला, दोन्ही देशांच्या खेळाडूंना मिळणार इतके पैसे!

T20 World Cup : भारत-पाकिस्तानचा महामुकाबला, दोन्ही देशांच्या खेळाडूंना मिळणार इतके पैसे!

टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सगळ्यात मोठ्या मुकाबल्याची उलटी गिनती सुरू झाली आहे. भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातला सामना रविवार 24 ऑक्टोबरला होणार आहे.

 • Share this:
  दुबई, 19 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सगळ्यात मोठ्या मुकाबल्याची उलटी गिनती सुरू झाली आहे. भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातला सामना रविवार 24 ऑक्टोबरला होणार आहे. जवळपास 28 महिन्यांनी या टीम एकमेकांविरुद्ध खेळतील. याआधी 2019 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही टीममध्ये मुकाबला झाला होता. आयसीसीलाही (ICC) या सामन्यामुळे छप्पर फाड कमाई होणार आहे. भारत-पाकिस्तान सामना असला की स्पॉन्सरपासून ते टीव्ही जाहिरातींपर्यंतच्या किंमती शंभर पटींनी वाढतात, त्यामुळे खेळाडूंवरही चांगल्या कामगिरीसाठी दबाव असतो. पण एक मॅच खेळण्यासाठी भारत-पाकिस्तानच्या खेळाडूंना किती पैसे मिळतात हे तुम्हाला माहिती आहे का? पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) सध्या खराब काळातून जात आहे. जवळपास 12 वर्षांनंतर पाकिस्तानला त्यांच्या देशात मोठ्या टीम दौरा करतील असं वाटत होतं, पण दहशतवादी हल्ल्याच्या धोक्याने न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या टीमने पाकिस्तान दौरा करायला नकार दिला. आधीच अडचणीत सापडलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आर्थिक स्थिती यामुळे आणखी खराब झाली. पाकिस्तानी खेळाडूंना बोर्डाकडून पैसे वाढवण्यासाठी वारंवार विनंती करावी लागते. खेळाडूंची कमाई यंदाच्या वर्षी जुलै महिन्यात पाकिस्तानी खेळाडूंच्या पगारामध्ये थोडी वाढ झाली, पण त्यांचा पगार श्रीलंका आणि बांगलादेशच्या खेळाडूंएवढा आहे. भारताप्रमाणेच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खेळाडूंसोबत वर्षाचा करार करतं. पीसीबी ए ग्रेडमधल्या खेळाडूंना प्रत्येक वर्षी 1 कोटी 20 लाख रुपये देतं. भारतीय चलनानुसार ही रक्कम 52 लाख रुपये एवढी आहे. तर भारताच्या ए ग्रेडमधल्या खेळाडूंना वर्षाला 7 कोटी रुपये मिळतात. एका मॅचसाठी एवढं मानधन पाकिस्तानी खेळाडूंना वेगवेगळ्या ग्रेडच्या हिशोबाने वेगवेगळं मानधन दिलं जातं. टेस्ट मॅचसाठी 3.5 लाख रुपये, वनडेसाठी 2.2 लाख रुपये आणि टी-20 साठी 1 लाख 60 हजार रुपये पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खेळाडूंना देतं. जर एखादा खेळाडू सी ग्रेडमध्ये असेल तर त्याला याहीपेक्षा कमी मानधन मिळतं. भारतामध्ये स्थानिक क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूलाही यापेक्षा जास्त पैसे दिले जातात. भारतीय खेळाडूंचा पगार बीसीसीआय (BCCI) ए ग्रेडमध्ये असलेल्या खेळाडूंना वर्षाला 7 कोटी रुपये, बी ग्रेडच्या खेळाडूंना 5 कोटी रुपये आणि सी ग्रेडच्या खेळाडूंना 3 कोटी रुपये देतं. पाकिस्तानी खेळाडूंना मात्र काही लाखांमध्येच पैसे मिळतात. मॅच फीसोबत बोनसही टीम इंडियाच्या खेळाडूंना प्रत्येक टेस्टसाठी 15 लाख, वनडेसाठी 6 लाख आणि टी-20 साठी 3 लाख रुपये दिले जातात. याशिवाय खेळाडूंना बोनसही दिला जातो. भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राच्या मते भारतीय खेळाडूंना मॅच फीशिवाय डबल सेंच्युरी केली तर 7 लाख रुपये, शतक केलं तर 5 लाख आणि 5 विकेट घेतल्यावर 5 लाख रुपये मिळतात. म्हणजेच एक टेस्ट मॅच खेळणारा खेळाडू एका सामन्यातून 25 लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकतो. पाकिस्तानच्या सी ग्रेडच्या खेळाडूला एका वर्षालाही एवढे पैसे मिळत नाहीत.
  Published by:Shreyas
  First published: