मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : भारताला कसं हरवायचं? IND vs PAK मुकाबल्याआधी इम्रान खान यांच्या बाबर आझमला टिप्स

T20 World Cup : भारताला कसं हरवायचं? IND vs PAK मुकाबल्याआधी इम्रान खान यांच्या बाबर आझमला टिप्स

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) होणार आहे. टी-20 वर्ल्ड कपसाठी युएईला यायच्या आधी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने पाकिस्तानचे पंतप्रधान तसंच माजी कर्णधार इम्रान खान (Imran Khan) यांची भेट घेतली होती.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

दुबई, 23 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) होणार आहे. याआधी वनडे आणि टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने कधीही भारताचा पराभव केला नाही. हे रेकॉर्ड बदलण्यासाठी पाकिस्तानची टीम रविवारी मैदानात उतरणार आहे. टी-20 वर्ल्ड कपसाठी युएईला यायच्या आधी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने पाकिस्तानचे पंतप्रधान तसंच माजी कर्णधार इम्रान खान (Imran Khan) यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान इम्रान खान यांनी बाबर आझमला विजयाचा गुरू मंत्र दिला होता. बाबर आझमनेच भारताविरुद्धच्या सामन्याआधी याचा खुलासा केला आहे. इम्रान खान यांनी 1992 साली पहिला वर्ल्ड कप जिंकला तेव्हाचा अनुभव बाबर आझमसोबत शेयर केला.

'इकडे यायच्या आधी आमची भेट पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत झाली. त्यांनी 1992 सालच्या वर्ल्ड कपमध्ये टीमची मानसिकता आणि बॉडी लॅन्ग्वेज कशी होती, हे सांगितलं,' असं बाबर आझम म्हणाला.

भारताविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी खेळाडूंना काही संदेश दिला का? असा प्रश्न बाबर आझमला विचारण्यात आला. 'तुम्ही जेवढे शांत राहाल आणि गोष्टी सरळ सोप्या ठेवाल तेवढं चांगलं राहिल. बाहेरच्या गोष्टी बाहेरच ठेवा. स्वत:वर विश्वास ठेवा आणि 100 टक्के योगदान द्या,' असं रमीझ राजा यांनी सांगितल्याची प्रतिक्रिया बाबरने दिली.

'आमची टीम भारताविरुद्धच्या रेकॉर्डबाबत चिंतेत नाही. आम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करत आहोत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातलं द्वंद्व जगजाहीर आहे. आम्ही मागच्या रेकॉर्डवर लक्ष देत नाही, आम्ही वर्ल्ड कपबाबत विचार करतोय,' असं बाबर आझमने सांगितलं.

दोन्ही शेजारी देशांमध्ये तणावपूर्ण संबंधांमुळे द्विपक्षीय सीरिज होत नाही. याआधी भारत-पाकिस्तान यांच्यात 2019 वनडे वर्ल्ड कपदरम्यान इंग्लंडमध्ये सामना झाला होता. या सामन्याआधीही इम्रान खान यांनी पाकिस्तानला टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा सल्ला दिला होता, पण तेव्हाचा कर्णधार सरफराज अहमद याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला होता.

First published:

Tags: Babar azam, Imran khan, India vs Pakistan, T20 world cup