Home /News /sport /

T20 World Cup मध्ये भारतासाठी डोकेदुखी ठरणार ही जोडी! विराटला शोधावं लागणार उत्तर

T20 World Cup मध्ये भारतासाठी डोकेदुखी ठरणार ही जोडी! विराटला शोधावं लागणार उत्तर

टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) सुरू व्हायला आता आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान युएई आणि ओमानमध्ये स्पर्धा खेळवली जाणार आहे. भारताचा पहिलाच सामना 24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) होणार आहे.

पुढे वाचा ...
  दुबई, 11 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) सुरू व्हायला आता आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान युएई आणि ओमानमध्ये स्पर्धा खेळवली जाणार आहे. भारताचा पहिलाच सामना 24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) होणार आहे. या महामुकाबल्याची तिकीटं एका तासाच्या आतच विकली गेली. दोन्ही देशांचे क्रिकेट चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचं पाकिस्तानविरुद्धचं रेकॉर्ड शानदार आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध टी-20 वर्ल्ड कपमधल्या पाचही मॅच जिंकल्या आहेत. यावर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक सामन्यांमध्ये पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) यांची जोडी धोकादायक ठरली आहे. दोन्ही बॅट्समननी 57 च्या सरासरीने 736 रनची पार्टनरशीप केली आहे. या दोघांनी या रन टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये केल्य आहेत. भारताच्या शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) जोडीने आतापर्यंत 712 रनची पार्टनरशीप केली आहे, पण दोघंही टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीममध्ये नाहीत. मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि केएल राहुलच्या (KL Rahul) जोडीनेही 600 पेक्षा जास्त रन एकत्र केले आहेत, पण मयंकही भारताच्या टीममध्ये नाही. बाबर-रिझवानच्या पुढे कोणी नाही बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने 1 जानेवारी 2021 पासून आतापर्यंत 13 टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 3 शतक आणि 2 अर्धशतकी पार्टनरशीप करत 736 रन केले, यातल्या 521 रन ओपनिंग जोडी म्हणून आल्या आहेत. या दोघांमध्ये 197 रनची सगळ्यात मोठी पार्टनरशीपही झाली आहे. बाबर-रिझवानची ही जोडी टी-20 वर्ल्ड कपमध्येही ओपनिंगलाच खेळण्याची शक्यता आहे, त्यामुळे भारतासाठी दोघंही डोकेदुखी ठरू शकतात. T20 World Cup 2021: बाबर आजम और मोहम्मद रिजवान इन साल 700 से अधिक रन जोड़ चुके हैं. (AFP) यावर्षी सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रिझवान पहिल्या आणि बाबर दुसऱ्या क्रमांकावर आहे. रिझवानने 17 सामन्यांमध्ये 94 च्या सरासरीने 752 रन केले, तसंच त्याचा स्ट्राईक रेटही 140 चा आहे, यात एक शतक आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. तर दुसरीकडे कर्णधार बाबर आझमने 17 मॅचमध्ये 37 च्या सरासरीने 523 रन केले, त्याचा स्ट्राईक रेट 133 चा आहे. बाबरने या काळात 1 शतक आणि 4 अर्धशतकं केली. पाकिस्तानने 17 आणि भारताने 8 टी-20 मॅच खेळल्या 1 जानेवारी 2021 पासून आतापर्यंत पाकिस्तानने 17 आणि भारताने 8 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या. यादरम्यान विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने सर्वाधिक 2 मॅचमध्ये 151 रनची पार्टनरशीप केली. इशान किशन-विराट कोहलीमध्ये 98 रनची आणि कोहली-रोहितमध्ये 94 रनची पार्टनरशीप झाली. भारताकडून सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय रन विराटने केले. 5 मॅचमध्ये 116 च्या सरासरीने त्याला 231 रन करता आले, यात 3 अर्धशतकं आहेत. भारताच्या इतर कोणत्याही खेळाडूला 200 रनचा आकडा गाठता आलेला नाही. इशान किशनला संधी? भारताचा युवा खेळाडू इशान किशनने (Ishan Kishan) आयपीएल 2021 च्या (IPL 2021) अखेरच्या दोन सामन्यांमध्ये मुंबईसाठी ओपनिंगला बॅटिंग केली. हैदराबादविरुद्ध त्याने 84 आणि राजस्थानविरुद्ध नाबाद 50 रनची खेळी केली. त्यामुळे पहिल्या सामन्यात रोहितबरोबर इशानला ओपनिंगला खेळण्याची संधी मिळू शकते. पण केएल राहुलने आयपीएलमध्ये ओपनर म्हणून सर्वाधिक 600 रन केले आहेत.
  Published by:Shreyas
  First published:

  Tags: Babar azam, India vs Pakistan, T20 world cup, Virat kohli

  पुढील बातम्या