• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup : India जिंकणार का Pakistan? ज्योतिषी जगन्नाथ गुरूजींची भविष्यवाणी

T20 World Cup : India जिंकणार का Pakistan? ज्योतिषी जगन्नाथ गुरूजींची भविष्यवाणी

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात आज टी-20 वर्ल्ड कपचा (T20 World Cup) महामुकाबला रंगणार आहे.

 • Share this:
  दुबई, 24 ऑक्टोबर : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात आज टी-20 वर्ल्ड कपचा (T20 World Cup) महामुकाबला रंगणार आहे. दुबईमध्ये संध्याकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. या मॅचबाबत अनेक दिग्गज क्रिकेटपटू आणि क्रिकेट रसिकांनी आपली आवडती टीम आणि विजयाचा दावेदार सांगितला आहे. यातच लोकप्रिय ज्योतिषी (Astrologer) आणि फेस रिडर (Face Reader) पंडित जगन्नाथ गुरूजी यांनी मॅचबाबत भविष्यवाणी केली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणाऱ्या या मॅचसाठी दोन्ही टीमचे खेळाडू तयार आहेत. टीम इंडियाचं नेतृत्व कर्णधार विराट कोहलीकडे (Virat Kohli) आहे. तर पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात पाचवेळा टी-20 वर्ल्ड कपचा सामना झाला आहे, यातल्या प्रत्येकवेळा भारताचा विजय झाला आहे. यावेळी हे रेकॉर्ड अबाधित राहणार का पाकिस्तानला रेकॉर्ड मोडण्यात यश येणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पंडित जगन्नाथ गुरूजी यांना या मॅचबाबत विचारण्यात आलं. 'कोणत्याही टीमला पराभव झालेला आवडणार नाही. दुबईमधली ही मॅच दोन्ही टीमसाठी सोपी असणार नाही. दोन्ही टीमचे खेळाडू या मॅचसाठी फिट आहेत. कोहलीच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहिले तर त्याची टीम चांगल्या प्रकारची कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे. खेळाडू फक्त आत्मविश्वासच नाही तर पूर्णपणे सराव करून मैदानात उतरात,' असं पंडित जगन्नाथ गुरूजी म्हणाले. 'कोहली असल्यामुळे संपूर्ण टीमला मजबुती मिळते. तसंच कोहलीच्या कुंडलीमधला सूर्य आणि शनी मजबूत असल्यामुळे तो आपल्या टीमला विजय मिळवून देण्यात यशस्वी राहील. पाकिस्तानची टीमही विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करेल, पण उत्तरी चंद्राचा प्रभाव ज्याला राहू मानलं जातं, शनीसोबत भारताला हरवण्याची शक्यता कमी करतो,' असं वक्तव्य जगन्नाथ गुरूजींनी केलं.
  Published by:Shreyas
  First published: