• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • T-20 WC मध्ये न्यूझीलंडविरोधात हरल्यास स्पर्धेबाहेर जाऊ शकते 'विराट सेना'? एका पराभवाने ओढावली नामुष्की

T-20 WC मध्ये न्यूझीलंडविरोधात हरल्यास स्पर्धेबाहेर जाऊ शकते 'विराट सेना'? एका पराभवाने ओढावली नामुष्की

Team India

Team India

दिग्गज आणि विजेतेपदाचा दावेदार मानल्या जाणाऱ्या भारताच्या टीमला 24 ऑक्टोबर 2021 ला झालेल्या स्पर्धेतल्या पहिल्या मॅचमध्येच कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून (Ind Vs Pakistan) लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभवामुळे भारतीय संघासमोर अडचणी उभ्या केल्या आहेत.

  • Share this:
दुबई, 26 ऑक्टोबर: दुबईमध्ये सध्या टी-20 वर्ल्ड कप क्रिकेट (T-20 World Cup Latest Update) स्पर्धा सुरू आहे. दिग्गज आणि विजेतेपदाचा दावेदार मानल्या जाणाऱ्या भारताच्या टीमला 24 ऑक्टोबर 2021 ला झालेल्या स्पर्धेतल्या पहिल्या मॅचमध्येच कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून (Ind Vs Pakistan) लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. बाबर आझमच्या (Babar Azam Pakistan Team) नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाने विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाला 10 विकेट्सनी (Pakistan won against India by 10 wickets) पराभूत केलं. या पराभवामुळे स्पर्धेतील भारताची स्थिती बिकट झाली आहे आणि 31 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्धच्या (India Vs New Zealand T20 World Cup match) मॅचमध्ये जर भारत हरला तर भारताला पुढचे तीन सामने जिंकणं बंधनकारक होईल. भारताची रविवारी 31 ऑक्टोबरला होणारी मॅच जिंकणं अत्यंत आवश्यक आहे. पाकिस्ताननंतर जर न्यूझीलंडने भारताला हरवलं तर स्पर्धेत भारताची स्थिती बिकट होईल. स्पर्धेत आपलं आव्हान राखण्यासाठी त्यानंतर अफगाणिस्तान, स्कॉटलँड आणि नामिबियाशी होणाऱ्या मॅचेस जिंकाव्याच लागतील. तसंच स्थान टिकवण्यासाठी इतर टीममधील मॅचच्या निकालांवरही भारतीय संघाला अवलंबून रहावं लागेल. या स्पर्धेत सेमीफायनलपर्यंत जाण्यासाठी भारताला सर्वोत्तम 2 टीममध्ये पोहोचावं लागेल. जर न्यूझीलंडकडून भारताचा पराभव झाला तर भारताला पाकिस्तान किंवा न्यूझीलंडचाही दोन सामन्यात पराभव व्हावा अशी कामना करावी लागेल. वाचा-न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचआधी विराटला खेळाडूंचा फॉर्म नाही, तर या गोष्टीची चिंता दरम्यान या व्यतिरिक्त भारताच्या उर्वरित 3 मॅचमध्ये भारताला खूप चांगल्या रन-रेटने मॅच जिंकाव्या लागतील. असं झालं तर भारताने पहिल्या दोन मॅच हरल्यानंतरही सेमीफायनल गाठता येईल. भारताला सेमीफायनलमध्ये जायचं असेल तर न्यूझीलंड किंवा पाकिस्तान यापैकी एक टीम सेमीफायनलमध्ये पोहोचता कामा नये. तसंच अफगाणिस्तानलाही रोखावं लागेल. अफगाणिस्तानची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचू शकली नाही तरी भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या वाटेत अडथळे निर्माण करू शकते. जर भारताला पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला तर भारताला अफगाणिस्तानपासूनही सावध रहावं लागेल. अफगाणिस्तानने बड्याबड्या संघांना पराभवाची धूळ चारली आहे. 2019 च्या वर्ल्ड कपमध्येही अफगाणिस्तानकडून हरताहरता भारत बचावला होता. वाचा-T20 World Cup : सचिन तेंडुलकर ते राहुल गांधी, मोहम्मद शमीसाठी दिग्गजांची बॅटिंग! अफगाणिस्तानने 25 ऑक्टोबरला स्कॉटलंडला 130 रन्सनी पराभूत केलं. भारतविरुद्ध अफगाणिस्तान सामना 3 नोव्हेंबरला अबुधाबीमध्ये होणार आहे. स्कॉटलंडविरुद्धच्या मॅचमध्ये मुजीब उर रेहमानने 4 ओव्हरमध्ये 20 रन देत 5 विकेट्स घेतल्या तर राशीद खानने 2.2 ओव्हरमध्ये 4 विकेट्स घेतल्या. त्यामुळे भारताला टी-20 वर्ल्ड कपमधील या पुढचा प्रवास सावधगिरीने करावा लागेल. न्यूझीलंडला पराभूत केलं तर बराचसा ताण कमी होईल.
First published: