• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup IND vs NZ : मुंबई इंडियन्सनीच केला टीम इंडियाचा घात, विराटचा निर्णय 17 बॉलमध्येच पडला भारी

T20 World Cup IND vs NZ : मुंबई इंडियन्सनीच केला टीम इंडियाचा घात, विराटचा निर्णय 17 बॉलमध्येच पडला भारी

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भारताविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा (India vs New Zealand) कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) याने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. या सामन्यात विराटने (Virat Kohli) फक्त टीममध्येच बदल केले नाहीत, तर टीमची रणनितीही बदलली आहे.

 • Share this:
  दुबई, 31 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भारताविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा (India vs New Zealand) कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) याने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. या मॅचसाठी न्यूझीलंडने टीममध्ये एक तर भारताने दोन बदल केले. सूर्यकुमार यादवऐवजी (Suryakumar Yadav) इशान किशन (Ishan Kishan) आणि भुवनेश्वर कुमारऐवजी (Bhuvneshwar Kumar) शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) टीममध्ये स्थान देण्यात आलं आहे. या सामन्यात विराटने फक्त टीममध्येच बदल केले नाहीत, तर टीमची रणनितीही बदलली आहे. विराट कोहलीच्या या रणनितीचा फक्त न्यूझीलंडच नाही तर भारतीय क्रिकेट चाहत्यांनाही धक्का बसला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात रोहित शर्माऐवजी (Rohit Sharma) ईशान किशन केएल राहुलसोबत ओपनिंगला बॅटिंगसाठी आला. हे दोघं बॅटिंगसाठी मैदानात येत असल्याचं बघून कॉमेंट्री करत असलेल्या मुरली कार्तिक आणि सायमन डूल यांनीही आश्चर्य व्यक्त केलं. विराट कोहलीचा हा निर्णय टीम इंडियाला चांगलाच महागात पडला. कारण इशान किशन मॅचच्या 17 व्या बॉलला 4 रन करून आऊट झाला. ट्रेन्ट बोल्टने इशान किशनला आऊट केलं. इशान किशन आणि ट्रेन्ट बोल्ट आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतात. आयपीएल दरम्यानही विराट कोहलीने आपल्याला ओपनिंगला खेळण्यासाठी तयार राहा, असं सांगितल्यांच इशान किशन म्हणाला होता. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर 4 शतकं आहेत. ही चारही शतकं रोहितने ओपनिंगला खेळून केली आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रमही रोहित शर्माच्या नावावर आहे. एवढं शानदार रेकॉर्ड असतानाही विराटने ही रणनिती का अवलंबली, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. न्यूझीलंडच्या टीममध्ये ईश सोढी आणि मिचेल सॅन्टनर हे दोन स्पिनर असल्यामुळे विराटने डावखुरा बॅट्समन असलेल्या ईशान किशनला संधी दिल्याचं सांगितलं जात आहे. भारतीय टीम ईशान किशन, केएल राहुल, विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह भारतीय टीमने टी-20 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडला एकदाही पराभूत केलेलं नाही. याआधी 2007 आणि 2016 सालच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा किवी टीमने पराभव केला होता. वर्ल्ड कपमध्ये 18 वर्षांपूर्वी भारताने न्यूझीलंडला पराभूत केलं होतं. 2003 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने किवींना 7 विकेटने धूळ चारली होती. दोन्ही टीमसाठी करो या मरो हा सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही टीमसाठी करो या मरोचा आहे, कारण पाकिस्तानच्या टीमने सुरुवातीचे तिन्ही सामने जिंकले आहेत. पाकिस्तानचे उरलेले सामने नामिबिया आणि स्कॉटलंड या दोन दुबळ्या टीमविरोधात आहेत. या दोन्ही मॅचमध्ये पाकिस्तानचा विजय झाला तर ते दुसऱ्या ग्रुपमध्ये पहिल्या स्थानावर राहतील, मग भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसऱ्या स्थानासाठी लढत असेल. भारत आणि न्यूझीलंड यांचे उरलेले सामने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध आहेत, त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला हा सामना क्वार्टर फायनलसारखाच आहे.
  Published by:Shreyas
  First published: