T20 World Cup : न्यूझीलंडविरुद्ध हार्दिक Playing XI मध्ये असणार का? विराटने दिली Update
T20 World Cup : न्यूझीलंडविरुद्ध हार्दिक Playing XI मध्ये असणार का? विराटने दिली Update
टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) रविवारी टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) होणार आहे. या मॅचआधी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) ऑलराऊंडर हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya Fitness) फिटनेसबाबत माहिती दिली आहे.
दुबई, 30 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) रविवारी टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) होणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर भारतासाठी हा सामना जिंकणं गरजेचं आहे, कारण या मॅचमध्ये पराभव झाला तर टीम इंडियाचं सेमी फायनलला पोहोचणं मुश्किल होऊ शकतं. या मॅचआधी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) चाहत्यांना चांगली बातमी दिली आहे. ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya Fitness) फिट असल्याचं विराट कोहली पत्रकार परिषदेमध्ये म्हणाला होता. पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये बॅटिंग करताना हार्दिकच्या खांद्याला दुखापत झाली, यानंतर तो फिल्डिंगसाठीही मैदानात आला नाही, तसंच त्याला खांद्याच्या स्कॅनिंगसाठीही नेण्यात आलं होतं. तुमच्याकडे बॉलिंगसाठी सहावा पर्याय उपलब्ध पाहिजे, मग तो मी असो किंवा हार्दिक, अशी प्रतिक्रिया विराटने दिली.
हार्दिक पांड्या फिट असल्याचं विराटने सांगितलं असलं तरी तो न्यूझीलंडविरुद्ध प्लेयिंग इलेव्हनचा भाग असेल का नाही, तसंच तो टीममध्ये असला तर बॉलिंग करेल का? याबाबत विराटने कोणतीही माहिती दिली नाही. पाकिस्तानविरुद्धच्या मॅचवेळी बॅटिंग करत असताना हार्दिकला शाहिन आफ्रिदीने टाकलेला बाऊन्सर लागला होता. पांड्याने त्या मॅचमध्ये 8 बॉलमध्ये 11 रन केले. भारताने तो सामना 10 विकेटने गमावला.
पूर्णपणे फिट नसतानाही शार्दुल ठाकूरऐवजी (Shardul Thakur) पांड्याला खेळवण्यात आलं होतं. आता न्यूझीलंडविरुद्धही टीम इंडिया हीच रणनिती वापरणार का? याबाबत विराटने अजून काहीही स्पष्ट सांगितलेलं नाही. 'शार्दुल आमच्या प्लानिंगचा भाग आहे. तो वारंवार चांगली कामगिरी करून आपला दावा मजबूत करत आहे. तो असा खेळाडू आहे, जो टीमसाठी मूल्यवान ठरू शकतो,' असं विराट म्हणाला.
टी-20 वर्ल्ड कपसाठी टीमची निवड झाली तेव्हापासूनच हार्दिक पांड्याच्या फिटनेसविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत. आयपीएलमध्येही हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्ससाठी बॉलिंग केली नाही. दोन वर्षांपूर्वी पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर हार्दिक फारसा बॉलिंग करताना दिसला नाही. हार्दिक बॉलिंग करत नसल्याने टीमकडे बॉलिंगसाठी सहावा पर्याय उपलब्ध नाही, त्यामुळे टीमचं संतुलनही बिघडत आहे.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा पुढचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. 31 ऑक्टोबरला संध्याकाळी 7.30 वाजता या मॅचला सुरुवात होईल. भारत आणि न्यूझीलंडने स्पर्धेतले आपले पहिले सामने पाकिस्तानविरुद्धच गमावले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पराभव झाला तर टीम इंडियासाठी सेमी फायनल गाठणं कठीण होऊन बसेल. टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि न्यूझीलंड दोन वेळा आमने सामने आले आहेत. 2007 आणि 2016 साली दोन्ही टीममध्ये टी-20 वर्ल्ड कपमध्ये मॅच झाली, या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला.
Published by:Shreyas
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.