मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : टीम इंडियाला 'आफ्रिदी' सारखाच त्रास देणार, न्यूझीलंडच्या बॉलरचं विराटसेनेला चॅलेंज!

T20 World Cup : टीम इंडियाला 'आफ्रिदी' सारखाच त्रास देणार, न्यूझीलंडच्या बॉलरचं विराटसेनेला चॅलेंज!

टी-20 वर्ल्ड कपमधला (T20 World Cup) टीम इंडियाचा दुसरा सामना न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) रविवारी होणार आहे. याआधी पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताला (India vs Pakistan) पराभवाचा धक्का बसला होता.

टी-20 वर्ल्ड कपमधला (T20 World Cup) टीम इंडियाचा दुसरा सामना न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) रविवारी होणार आहे. याआधी पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताला (India vs Pakistan) पराभवाचा धक्का बसला होता.

टी-20 वर्ल्ड कपमधला (T20 World Cup) टीम इंडियाचा दुसरा सामना न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) रविवारी होणार आहे. याआधी पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताला (India vs Pakistan) पराभवाचा धक्का बसला होता.

  • Published by:  Shreyas
दुबई, 30 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमधला (T20 World Cup) टीम इंडियाचा दुसरा सामना न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) रविवारी होणार आहे. याआधी पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताला (India vs Pakistan) पराभवाचा धक्का बसला होता, त्यामुळे आता सेमी फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग सोपा करायचा असेल तर टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकावा लागणार आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही टीमचा पाकिस्तानने पराभव केला आहे. यानंतर आता भारताविरुद्धच्या सामन्याआधी न्यूझीलंडचा डावखुरा फास्ट बॉलर ट्रेन्ट बोल्टने (Trent Boult) विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीमला इशारा दिला आहे. आपणही शाहिन आफ्रिदीसारखी (Shaheen Afridi) बॉलिंग करून टीम इंडियाला त्रास देण्यासाठी तयार आहोत, असं बोल्ट म्हणाला. पाकिस्तानचा डावखुरा फास्ट बॉलर शाहिन आफ्रिदीने भारताला सुरुवातीलाच धक्के दिले. रोहित शर्मा (R0hit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) या ओपनरना स्वस्तात माघारी पाठवल्यानंतर शाहिन आफ्रिदीने विराट कोहलीचीही विकेट घेतली. मॅचच्या पूर्वसंध्येला ट्रेन्ट बोल्ट माध्यमांशी बोलत होता. 'मला बॉलिंग कधी दिली जाते, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. कोणता बॉलर कधी बॉलिंग करेल, याची योजना काय असेल, हे मला माहिती नाही, पण शाहिनने भारताविरुद्ध केलेली बॉलिंग उत्कृष्ट होती. भारताकडे चांगले बॅट्समन आहेत, त्यामुळे आम्ही सुरुवातीलाच विकेट घेण्याचा प्रयत्न करू. सुरुवातीला थोडा स्विंग मिळण्याची शक्यता आहे. शाहिनने टीम इंडियाविरुद्ध जे केलं तेच करण्याची आमची इच्छा आहे,' असं वक्तव्य बोल्टने केलं. विराट कोहलीलाही बोल्टच्या या वक्तव्याबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्याने आम्ही या मुकाबल्यासाठी तयार आहोत. बोल्टचा सामना आम्ही आधीही केला आहे, अशी प्रतिक्रिया विराटने दिली. ट्रेन्ट बोल्टने याआधीच्या तीन टी-20 मध्ये दोनवेळा रोहित शर्माची विकेट घेतली आहे. 'सगळे खेळाडू भारताविरुद्धच्या मॅचसाठी उत्साही आहेत. आम्हाला पाकिस्तानविरुद्ध चांगली सुरुवात करता आली नव्हती. आता आम्ही टीम इंडियाला आव्हान द्यायला तयार आहोत,' असं बोल्टने सांगितलं. 'आम्ही जे आधीपासून करत आहे तेच चांगल्या प्रकारे करण्याची गरज आहे. भारताकडून आम्हाला नक्कीच आव्हान मिळेल. ती एक उत्कृष्ट टीम आहे. आम्हाला त्यांना आऊट करण्यासाठी रणनिती बनवावी लागेल. आम्ही जर पहिले बॅटिंग केली तर त्यांना मोठं आव्हान द्यायचा प्रयत्न करू,' असं बोल्ट म्हणाला. सुपर-12 मध्ये पाकिस्तानने आतापर्यंत तिन्ही सामने जिंकले आहेत, त्यामुळे त्यांचं सेमी फायनलचं तिकीट जवळपास निश्चित झालं आहे. पाकिस्तानचे उरलेले सामने आता नामिबिया आणि स्कॉटलंड या दुबळ्या टीमविरुद्ध आहेत, त्यामुळे हे दोन्ही सामने जिंकून पाकिस्तानची टीम पहिल्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे. सेमी फायनलमध्ये पाकिस्तानची टीम क्वालिफाय झाली तर दुसऱ्या स्थानासाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात स्पर्धा आहे, त्यामुळे रविवारच्या मॅचला क्वार्टर फायनलचं स्वरूप आलं आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही टीम 2007 आणि 2016 सालच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये आमने-सामने होत्या, या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला होता.
First published:

Tags: T20 world cup

पुढील बातम्या