मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup : पराभवानंतर विराटने केलं बुमराहला पुढे, चार वर्ल्ड कप खेळलेला भारताचा 'कॅप्टन' भडकला!

T20 World Cup : पराभवानंतर विराटने केलं बुमराहला पुढे, चार वर्ल्ड कप खेळलेला भारताचा 'कॅप्टन' भडकला!

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) कामगिरी अत्यंत लाजिरवाणी झाली आहे. पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) 10 विकेटने झालेल्या पराभवानंतर भारताने न्यूझीलंडविरुद्धचा (India vs New Zealand) सामना 8 विकेटने गमावला. या दोन पराभवामुळे टीम इंडियाचं सेमी फायनलला पोहोचण्याचं स्वप्न धूसर झालं आहे.

पुढे वाचा ...

दुबई, 1 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) कामगिरी अत्यंत लाजिरवाणी झाली आहे. पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) 10 विकेटने झालेल्या पराभवानंतर भारताने न्यूझीलंडविरुद्धचा (India vs New Zealand) सामना 8 विकेटने गमावला. या दोन पराभवामुळे टीम इंडियाचं सेमी फायनलला पोहोचण्याचं स्वप्न धूसर झालं आहे. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) स्वत: आला नाही, तर बुमराहने (Jasprit Bumrah) उपस्थिती लावली. विराट कोहली या पत्रकार परिषदेला न आल्यामुळे टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन (Mohammad Azharuddin) याने टीका केली आहे.

'पराभवामध्ये लाज वाटण्यासारखं काहीच नाही, पण तुम्ही समोर येऊन बोललं पाहिजे. हीच सगळ्यात योग्य गोष्ट असते. लोक तुम्हाला ऐकतील आणि नेमका पराभव कशामुळे झाला हे त्यांना कळेल. बुमराहचं बोलणं आणि कर्णधार किंवा कॅप्टनचं बोलणं यात फरक आहे,' असं अझरुद्दीन म्हणाला.

T20 World Cup : 'तुम्ही देशासाठी खेळत आहात', कॅप्टन कोहलीच्या त्या वक्तवामुळे कपिल देव संतापले

'जनतेच्या समोर येणं महत्त्वाचं आहे. तुम्ही देशासमोर येऊन बोललं पाहिजे. तुम्ही जर समोर आला नाहीत तर लोक काय विचार करतील? कारण नसताना अफवा पसरवल्या जातील,' अशी प्रतिक्रिया अझरुद्दीनने एबीपी न्यूजशी बोलताना दिली. मोहम्मद अझरुद्दीन भारताकडून 4 वर्ल्ड कप खेळला, यातल्या 1992, 1996 आणि 1999 वर्ल्ड कपमध्ये अझरने टीम इंडियाचं नेतृत्व केलं.

भारताचं सेमी फायनलचं गणित

भारत आणि न्यूझीलंडचे उरलेले सामने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध आहेत. कागदावर स्कॉटलंड आणि नामबियाच्या टीम दुबळ्या आहेत, तर अफगाणिस्तानमध्ये मोठा उलटफेर करण्याची शक्यता आहे. भारताने उरलेले तिन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले आणि न्यूझीलंडचा अफगाणिस्तानविरुद्ध पराभव झाला, तरच नेट रन रेटच्या माध्यमातून टीम इंडिया सेमी फायनलला पोहोचू शकते.

T20 World Cup : रोहित तिसऱ्या क्रमांकावर का आला? टीम इंडियातली धक्कादायक Inside Story

First published:
top videos

    Tags: Jasprit bumrah, T20 world cup, Team india, Virat kohli