मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : 'करो या मरो' मॅचआधी टीम इंडियासाठी गूड न्यूज, न्यूझीलंडच्या टीममधून आली मोठी Update

T20 World Cup : 'करो या मरो' मॅचआधी टीम इंडियासाठी गूड न्यूज, न्यूझीलंडच्या टीममधून आली मोठी Update

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) रविवारी भारताचा मुकाबला न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) होणार आहे. भारतासाठी ही मॅच जिंकणं गरजेचं आहे, कारण या सामन्यात पराभव झाला तर टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये पोहोचणं कठीण होईल.

  • Published by:  Shreyas

दुबई, 27 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) रविवारी भारताचा मुकाबला न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) होणार आहे. भारतासाठी ही मॅच जिंकणं गरजेचं आहे, कारण या सामन्यात पराभव झाला तर टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये पोहोचणं कठीण होईल. या सामन्याआधी न्यूझीलंडच्या टीमसाठी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. किवी टीमसाठी सर्वाधिक रन करणारा मार्टिन गप्टील (Martin Guptill) दुखापतग्रस्त झाला आहे, त्यामुळे तो भारताविरुद्धचा सामना खेळणार का नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मॅचवेळी हारिस राऊफने (Harris Rauf) टाकलेला बॉल गप्टीलच्या पायाच्या अंगठ्याला लागला. या मॅचमध्ये गप्टील 17 रन करून आऊट झाला.

न्यूझीलंडचे कोच गॅरी स्टीड यांनी पाकिस्तानविरुद्धच्या मॅचनंतर सांगितलं की आम्ही गप्टीलची दुखापत किती जास्त आहे ते बघू, सध्या त्याला त्रास होत आहे, पुढचे 24 ते 48 तास महत्त्वाचे असतील. न्यूझीलंडच्या टीमसाठी हा दुसरा धक्का आहे, कारण गप्टील आधी फास्ट बॉलर लॉकी फर्ग्युसनही दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे.

न्यूझीलंड आयसीसीवर नाराज

दरम्यान न्यूझीलंडची टीम आयसीसीवर (ICC) नाराज झाली आहे. आयसीसीच्या टेकनिकल समितीने फर्ग्युसनऐवजी एडम मिल्नेला टीममध्ये घ्यायला मंजुरी दिली नाही, त्यामुळे तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही. 'आम्ही बदली खेळाडूसाठी आयसीसीसोबत बरीच चर्चा केली. आमच्यासाठी ही गोष्ट निराशाजनक राहिली. मिल्ने फर्ग्युसनऐवजी टीममध्ये आला असता तर तो उपयुक्त खेळाडू आहे. आम्ही आयसीसीशी या मुद्द्यावर पुन्हा चर्चा करू,' असं स्टीड यांनी सांगितलं.

'पाकिस्तानविरुद्ध पराभव झाला असला तरी खेळाडूंच्या कामगिरीमुळे आपण समाधानी आहोत. आमच्या टीमने चांगली लढत दिली, पण पुढची स्पर्धा आता अवघड होईल. दुसऱ्या स्थानावर राहण्यासाठी आणि सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी जोरदार स्पर्धा रंगेल. भारताविरुद्धचा आमचा सामना आणखी महत्त्वाचा झाला आहे. जर भारताविरुद्ध आमचा विजय झाला तर आमची गाडी पुन्हा एकदा पटरीवर येईल,' असं स्टीड म्हणाले.

First published:

Tags: New zealand, T20 world cup, Team india