• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • 2007 World Cup चं भूत पुन्हा टीम इंडियाच्या मानगुटीवर, तेव्हा सचिन आता रोहित, यंदा 'चॅपल' कोण?

2007 World Cup चं भूत पुन्हा टीम इंडियाच्या मानगुटीवर, तेव्हा सचिन आता रोहित, यंदा 'चॅपल' कोण?

यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. पाकिस्तानविरुद्धचा (India vs Pakistan) सामना 10 विकेटने गमावल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या (India vs New Zealand) मॅचमध्येही भारताचे बॅट्समन अपयशी ठरले.

 • Share this:
  दुबई, 31 ऑक्टोबर : यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. पाकिस्तानविरुद्धचा (India vs Pakistan) सामना 10 विकेटने गमावल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या (India vs New Zealand) मॅचमध्येही भारताचे बॅट्समन अपयशी ठरले. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियसमनने (Kane Williamson) या मॅचमध्ये टॉस जिंकून भारतला पहिले बॅटिंगला बोलावलं, पण सुरुवातीपासूनच टीम इंडियाला धक्के बसले. टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक 4 शतकं करणाऱ्या रोहित शर्माला (Rohit Sharma) ओपनिंगला न पाठवण्याचा धक्कादायक निर्णय टीम इंडियाने घेतला. रोहित शर्माऐवजी ईशान किशन (Ishan Kishan) केएल राहुलसोबत (KL Rahul) ओपनिंगला आला, पण हा निर्णय चुकीचा असल्याचं 17 व्या बॉललाच निष्पन्न झालं. 8 बॉलमध्ये 4 रन करून ईशान किशन आऊट झाला. 2007 वर्ल्ड कपंच भूत टीम इंडियाने बॅटिंग ऑर्डरमध्ये असा बदल केल्यानंतर चाहत्यांना 2007 वनडे वर्ल्ड कपची आठवण झाली. 2007 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेश आणि श्रीलंकेने टीम इंडियाचा पराभव केला होता, ज्यामुळे टीम इंडिया वर्ल्ड कपच्या पहिल्याच राऊंडमधून बाहेर झाली होती. 2007 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माप्रमाणेच सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) बॅटिंग ऑर्डरही बदलण्यात आली होती. ओपनिंगऐवजी सचिन तेंडुलकर चौथ्या क्रमांकावर खेळला. ग्रेग चॅपल (Greg Chappell) यांची ही रणनिती असून सचिन याबाबत खूश नव्हता, असं नंतर समोर आलं होतं. टीम इंडिया सुपर-12 मधूनच आऊट? पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाचं सेमी फायनलला पोहोचणं आणखी कठीण झालं आहे. पाकिस्तानने तीन सामन्यांमध्ये तीन विजय मिळवल्यामुळे त्यांचं सेमी फायनलचं तिकीट जवळपास निश्चित झालं आहे. भारत आणि न्यूझीलंडचे उरलेले सामने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध आहेत. कागदावर स्कॉटलंड आणि नामबियाच्या टीम दुबळ्या आहेत, तर अफगाणिस्तानमध्ये मोठा उलटफेर करण्याची शक्यता आहे. भारताने उरलेले तिन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले आणि न्यूझीलंडचा अफगाणिस्तानविरुद्ध पराभव झाला, तरच नेट रन रेटच्या माध्यमातून टीम इंडिया सेमी फायनलला पोहोचू शकते.
  Published by:Shreyas
  First published: