मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup : टीम इंडियाच्या पराभवाचं पोस्टमॉर्टम, गंभीरने सांगितली विराटची सगळ्यात मोठी कमजोरी

T20 World Cup : टीम इंडियाच्या पराभवाचं पोस्टमॉर्टम, गंभीरने सांगितली विराटची सगळ्यात मोठी कमजोरी

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. पहिले पाकिस्तानने (India vs Pakistan) 10 विकेटने हरवल्यानंतर रविवारी न्यूझीलंडने टीम इंडियाचा (India vs New Zealand) 8 विकेटने पराभव केला.

पुढे वाचा ...

दुबई, 1 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. पहिले पाकिस्तानने (India vs Pakistan) 10 विकेटने हरवल्यानंतर रविवारी न्यूझीलंडने टीम इंडियाचा (India vs New Zealand) 8 विकेटने पराभव केला. या पराभवानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने विराट कोहली (Virat Kohli) आणि टीम इंडियावर निशाणा साधला आहे. विराट आणि टीम इंडियामध्ये मोठ्या सामन्यांमधला दबाव झेलण्याची क्षमता नाही, असं गंभीर म्हणाला आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोसोबत बोलताना गंभीरने भारताच्या पराभवाची कारणं सांगितली. कोहली दबावात चांगली कामगिरी करत नाही असं नाही, पण त्याला मोठ्या सामन्यात जशी कामगिरी केली पाहिजे, तशी करता येत नाही. तो मानसिक दृष्ट्या तेवढा मजबूत नाही, अशी प्रतिक्रिया गंभीरने दिली.

रोहित शर्माला ओपनिंगला न पाठवता तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याचा निर्णयही चुकीचा होता, असं ठाम मत गंभीरने मांडलं. रोहितने ओपनिंग करत टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 4 शतकं केली आहेत. रोहितसारखा अनुभवी बॅटर जर सुरुवातीच्या 6 ओव्हरमध्ये जलद सुरुवात करून देत नसेल, तर इशान किशनसारख्या तरुण खेळाडूंसाठी हे खूपच कठीण होतं, असं वक्तव्य गंभीरने केलं.

'तुम्ही दोन देशांमधल्या सीरिजमध्ये चांगली कामगिरी करता, पण अशा प्रकारच्या स्पर्धा आल्या की तुम्हाला पुढे येऊन चांगली कामगिरी करावी लागते. तुमच्यासाठी न्यूझीलंडविरुद्धचा सामना क्वार्टर फायनलसारखा होता. कुठेही चुकीला संधी नव्हती. या सामन्यात टीम इंडिया मानसिक दृष्ट्या मजबूत दिसली नाही,' असं गंभीर म्हणाला.

First published:

Tags: Gautam gambhir, T20 world cup, Team india, Virat kohli