• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup : किवी टीममधला 'मुंबई'कर, हिटमॅनला दिलं गिफ्ट, तुम्हीही म्हणाल Thank You!

T20 World Cup : किवी टीममधला 'मुंबई'कर, हिटमॅनला दिलं गिफ्ट, तुम्हीही म्हणाल Thank You!

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भारताचा सामना न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) होत असला तरी मैदानात मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) खेळाडूंची लढत पाहायला मिळत आहे.

 • Share this:
  दुबई, 31 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भारताचा सामना न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) होत असला तरी मैदानात मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) खेळाडूंची लढत पाहायला मिळत आहे. मॅचच्या 17 व्या बॉललाच ट्रेन्ट बोल्टने (Trent Boult) ईशान किशनला (Ishan Kishan) पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. 8 बॉलमध्ये 4 रन करून इशान किशन आऊट झाला. हे दोघंही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतात. ईशान किशन आऊट झाल्यानंतर मैदानात आणखी एकदा मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा सामना पाहायला मिळाला. ईशान किशनची विकेट घेतल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आला, यानंतर पहिल्याच बॉलला ट्रेन्ट बोल्टने टाकलेल्या बाऊन्सरवर रोहित शर्माने हूक शॉट मारला. पण फाईन लेगवर उभ्या असलेल्या एडम मिल्ने (Adam Milne) याने रोहित शर्माचा हातातला सोपा कॅच सोडला. एडम मिल्नेही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडूनच खेळतो, तर रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. मिल्नेनी जीवनदान दिल्यानंतर रोहित शर्माने त्याच्या बॉलिंगचाही समाचार घेतला. रोहितने पाचव्या ओव्हरच्या पाचव्या बॉलला फोर आणि सहाव्या बॉलला सिक्स मारली. या सुरुवातीनंतरही रोहित शर्माला मोठा स्कोअर करता आला नाही. 14 बॉलमध्ये 14 रन करून रोहित आऊट झाला. ईश सोढीच्या बॉलिंगवर रोहित शर्मा मिड ऑनच्या वरून सिक्स मारायला गेला, पण मार्टिन गप्टीलने रोहितचा कॅच पकडला. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात रोहित शर्माऐवजी (Rohit Sharma) ईशान किशन केएल राहुलसोबत ओपनिंगला बॅटिंगसाठी आला. हे दोघं बॅटिंगसाठी मैदानात येत असल्याचं बघून कॉमेंट्री करत असलेल्या मुरली कार्तिक आणि सायमन डूल यांनीही आश्चर्य व्यक्त केलं. विराट कोहलीचा हा निर्णय टीम इंडियाला चांगलाच महागात पडला. कारण इशान किशन मॅचच्या 17 व्या बॉलला 4 रन करून आऊट झाला. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर 4 शतकं आहेत. ही चारही शतकं रोहितने ओपनिंगला खेळून केली आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रमही रोहित शर्माच्या नावावर आहे. एवढं शानदार रेकॉर्ड असतानाही विराटने ही रणनिती का अवलंबली, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या सामन्यासाठी विराट कोहलीने टीम इंडियात दोन बदल केले. सूर्यकुमार यादवऐवजी इशान किशन आणि भुवनेश्वर कुमारऐवजी शार्दुल ठाकूरला टीममध्ये संधी देण्यात आली.
  Published by:Shreyas
  First published: