• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup : 'मी तर रम पित होतो', भारत-इंग्लंड मॅचनंतर जाफर-वॉनचा मैदानाबाहेर सामना

T20 World Cup : 'मी तर रम पित होतो', भारत-इंग्लंड मॅचनंतर जाफर-वॉनचा मैदानाबाहेर सामना

टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सराव सामन्यातून धमाकेदार सुरुवात केली आहे. सोमवारी विराट कोहलीच्या टीमने इंग्लंडचा (India vs England Practice Match) 7 विकेटने पराभव केला.

 • Share this:
  दुबई, 19 ऑक्टोबर : टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सराव सामन्यातून धमाकेदार सुरुवात केली आहे. सोमवारी विराट कोहलीच्या टीमने इंग्लंडचा (India vs England Practice Match) 7 विकेटने पराभव केला. इंग्लंडने दिलेलं 189 रनचं आव्हान भारताने एक ओव्हर शिल्लक असतानाच पूर्ण केलं. भारताच्या या शानदार विजयानंतर माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने (Wasim Jaffer) इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉनवर (Michael Vaughan) निशाणा साधला. इंग्लंडने दिलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना केएल राहुल आणि इशान किशन (Ishan Kishan) यांनी भारताला आक्रमक सुरुवात करून देत अर्धशतकं झळकावली. 46 बॉलमध्ये 70 रन करून इशान किशन रिटायर्ड हर्ट झाला. आयपीएल 2021 मध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहुलने (KL Rahul) या सामन्यात 24 बॉलमध्ये 6 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने 51 रन केले. मार्क वूडने राहुलची विकेट घेतली. दुसरीकडे बॉलिंगमध्ये मोहम्मद शमीने (Mohammad Shami) तीन विकेट मिळवल्या, तर बुमराहने (Jasprit Bumrah) जॉनी बेयरस्टोला यॉर्करवर बोल्ड केलं. अश्विनला (R Ashwin) या मॅचमध्ये एकही विकेट मिळाली नाही, पण त्याने 4 ओव्हरमध्ये फक्त 23 रन दिल्या. वसीम जाफर आणि मायकल वॉन यांच्यात ट्विटरवर याआधीही अनेकवेळा सामना रंगला. यंदा जाफरने मायकल वॉनवर निशाणा साधला. 'या विजयामध्ये तीन गोष्टी महत्त्वाच्या होत्या. केएल आणि इशानची बॅटिंग, बूम ऍश आणि शमीची बॉलिंग आणि मायकल वॉनचं ऑफलाईन असणं,' असं ट्वीट वसीम जाफरने केलं. वसीम जाफरच्या या ट्वीटला मायकल वॉननेही प्रत्युत्तर दिलं. 'सराव सामन्यांना फार महत्त्व नसतं. समुद्र किनाऱ्यावर बसून रम पिण्यात व्यस्त होतो,' अशी प्रतिक्रिया मायकल वॉनने दिली. इंग्लंडचा पराभव केल्यानंतर भारताचा पुढचा सराव सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 ऑक्टोबरला होणार आहे. वर्ल्ड कपमधला भारताचा हा अखेरचा सराव सामना असेल, यानंतर भारतीय टीम पाकिस्तानविरुद्ध 24 ऑक्टोबरला सुपर-12 चा आपला पहिला सामना खेळेल.
  Published by:Shreyas
  First published: