दुबई, 20 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (India vs Australia) सराव सामन्यात विराट कोहलीऐवजी (Virat Kohli) रोहित शर्मा (Rohit Sharma) टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून मैदानात उतरला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच (Aron Finch) याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण रोहित शर्माने सुरुवातीलाच आपल्या कॅप्टन्सीची चुणूक दाखवली. रोहित शर्माने मॅचची दुसरीच ओव्हर आर.अश्विनला (R Ashwin) दिली. अश्विननेही आपल्या कॅप्टनला निराश केलं नाही. दुसऱ्या ओव्हरच्या पाचव्या आणि सहाव्या बॉलला दोन विकेट घेतल्या. डेव्हिड वॉर्नर (David Warner) एक रनवर तर मिचेल मार्श (Mitchell Marsh) पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला.
अश्विनला रिव्हर्स स्वीप मारण्याच्या नादात वॉर्नर आऊट झाला, तर मिचेल मार्शने स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माला कॅच दिला. इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये अश्विनने चांगली बॉलिंग केली होती, पण त्याला एकही विकेट मिळाली नव्हती, पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध मात्र त्याने लागोपाठ दोन बॉलला दोन विकेट घेतल्या. इंग्लंडविरुद्ध अश्विनने 4 ओव्हरमध्ये 23 रन दिल्या होत्या.
अश्विनने दोन विकेट घेतल्यानंतरही रोहित शर्माने चौथी ओव्हर त्याला दिली नाही. त्याच्याऐवजी रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) बॉलिंगसाठी आला, यानंतर जडेजानेही ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचला माघारी पाठवलं. 8 रनवर एरॉन फिंच आऊट झाला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात भारताने विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती दिली आहे.
याआधीच्या सराव सामन्यात भारताने इंग्लंडचा 7 विकेट आणि एक ओव्हर राखून पराभव केला होता. इंग्लंडने दिलेलं 189 रनचं मोठं आव्हान भारताने अगदी सहज 19 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून पूर्ण केलं होतं. केएल राहुल (KL Rahul) आणि इशान किशन (Ishan Kishan) या दोन्ही ओपनरनी धमाकेदार अर्धशतकं करत भारताच्या विजयात मोलाचं योगदान दिलं होतं. या टी-20 वर्ल्ड कपमधला भारताचा हा अखेरचा सराव सामना आहे. या मॅचनंतर 24 ऑक्टोबर म्हणजेच रविवारी भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात पहिली मॅच होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs Australia, Rohit sharma, T20 world cup, Virat kohli