मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup : अफगाणिस्तानविरुद्ध हार्दिक नाही, हा असणार भारताचा 'सहावा' बॉलर, नेट प्रॅक्टिसचा VIDEO

T20 World Cup : अफगाणिस्तानविरुद्ध हार्दिक नाही, हा असणार भारताचा 'सहावा' बॉलर, नेट प्रॅक्टिसचा VIDEO

विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियावर (Team India) टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सुपर-12 स्टेजमधूनच बाहेर जायचा धोका निर्माण झाला आहे.

दुबई, 3 नोव्हेंबर : विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियावर (Team India) टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सुपर-12 स्टेजमधूनच बाहेर जायचा धोका निर्माण झाला आहे. पहिले पाकिस्तानविरुद्ध 10 विकेटने पराभव झाल्यानंतर न्यूझीलंडने भारताला 8 विकेटने मात दिली. आता आज भारताचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध (India vs Afghanistan) होणार आहे. यानंतर टीम इंडियाला नामिबिया आणि स्कॉटलंडविरुद्ध खेळायचं आहे. या तिन्ही सामन्यांमध्ये मोठ्या फरकाने जिंकून विराटच्या टीमला ग्रुपमधल्या इतर मॅचच्या निकालावर अवलंबून राहावं लागणार आहे, तरच टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहोचेल.

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात छोटीशी चूकही टीम इंडियाचं सेमी फायनलला पोहोचण्याचं स्वप्न भंगवू शकते, त्यामुळे विराटची टीम बुधवारी पहिले केलेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न करेल. अफगाणिस्तानची टीम मोठे उलटफेर करण्यासाठी ओळखली जाते. दुसऱ्या ग्रुपमध्ये अफगाणिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे. ही भीती ओळखून टीमने सामन्याआधी नेटमध्ये जोरदार सराव केला.

नेट प्रॅक्टिसमध्ये टीमचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) बॉलिंग करताना दिसला, तर न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमध्ये पाठीच्या दुखापतीमुळे खेळू न शकलेला सूर्यकुमार यादवही (Suryakumar Yadav) मैदानात पुन्हा आला. हार्दिक पांड्याच्या फिटनेसमुळे भारताला सहाव्या बॉलरची कमतरता जाणवत आहे, त्यामुळे रोहितने नेटमध्ये बॉलिंगचा सराव केला. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा सहावा बॉलर म्हणून दिसण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Hardik pandya, Rohit sharma, T20 world cup