मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs PAK : World Cup मध्ये भारताविरुद्ध एकही विजय नाही, तरी पाकिस्तानला 'भलताच' विश्वास

IND vs PAK : World Cup मध्ये भारताविरुद्ध एकही विजय नाही, तरी पाकिस्तानला 'भलताच' विश्वास

टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 17 ऑक्टोबरपासून ओमान आणि युएईमध्ये स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना 24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) होणार आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 5 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 17 ऑक्टोबरपासून ओमान आणि युएईमध्ये स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना 24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) होणार आहे, पण या सामन्याआधीच पाकिस्तानने माईंड गेम खेळायला सुरुवात केली आहे. भारतीय टीम पाकिस्तानविरुद्ध खेळत नाही, कारण ते आपल्या पेक्षा खालच्या दर्जाची टीम असल्याचं हास्यास्पद वक्तव्य पाकिस्तानचा माजी ऑल राऊंडर अब्दुल रझाकने (Abdul Razzaq) केलं आहे. पाकिस्तान टीममध्ये जशी प्रतिभा आहे, तशी भारतीय क्रिकेट टीममध्ये नसल्याचंही त्याला वाटतं.

अब्दुल रझाक अरे न्यूजला मुलाखत देत होता. 'भारतीय टीम पाकिस्तानशी मुकाबला करू शकत नाही, असं मला वाटतं. पाकिस्तानकडे जी प्रतिभा आहे, ती पूर्णपणे वेगळी आहे. भारत-पाकिस्तान सामने होत नाहीत, ही क्रिकेटसाठी चांगली गोष्ट नाही. भारत-पाकिस्तानमधले सामने रोमांचक अनुभव द्यायचे. खेळाडूंनाही आपण किती दबाव झेलू शकतो, हे भारत-पाकिस्तान मॅच दाखवायचं. आता असं होत नाही. मॅच झाल्या तर लोकांनाही कळेल पाकिस्तानजवळ किती टॅलेंट आहे, जे भारताकडे नाही,' असं वक्तव्य अब्दुल रझाकने केलं.

'पाकिस्तानने नेहमीच भारतापेक्षा चांगले खेळाडू तयार केले. भारताची टीमही चांगली आहे, पण आपल्याकडे इम्रान खान होते, जे कपिल देवपेक्षा वेगळे होते. तुलना केली तर इम्रान जास्त चांगले होते. आपल्याकडे वसीम अक्रम होता, पण त्यांच्याकडे त्या क्षमतेचा खेळाडू नव्हता. पाकिस्तानकडे जावेद मियांदाद होते, त्यांच्याकडे गावसकर होते. आपल्याकडे इंजमाम, युसूफ, युनूस, शाहिद आफ्रिदी होते. भारताकडे द्रविड सेहवाग होते. हे सगळं बघितलं तर आपल्याकडे कायमच चांगले खेळाडू होते, या कारणामुळे भारताला पाकिस्तानविरुद्ध खेळायचं नसतं,' असा हास्यास्पद दावाही रझाकने केला.

वनडे आणि टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध एकदाही पाकिस्तानला विजय मिळवता आलेला नाही. याआधी 2019 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही टीम समोरासमोर आल्या होत्या, त्यावेळीही भारताने पाकिस्तानला धूळ चारली होती.

First published:

Tags: India vs Pakistan, T20 world cup