• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup : नामिबियाचा पराभव करत टीम इंडियाचं पॅक अप, विराट-शास्त्रींचा शेवट गोड होऊनही निराशा

T20 World Cup : नामिबियाचा पराभव करत टीम इंडियाचं पॅक अप, विराट-शास्त्रींचा शेवट गोड होऊनही निराशा

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाने अखेरच्या सामन्यात नामिबियाचा (India vs Namibia) पराभव केला. नामिबायने दिलेल्या 133 रनच्या आव्हानाचा पाठलाग टीम इंडियाने 15.2 ओव्हरमध्ये एक विकेट गमावून केला.

 • Share this:
  दुबई, 8 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाने अखेरच्या सामन्यात नामिबियाचा (India vs Namibia) पराभव केला. नामिबायने दिलेल्या 133 रनच्या आव्हानाचा पाठलाग टीम इंडियाने 15.2 ओव्हरमध्ये एक विकेट गमावून केला. केएल राहुल 36 बॉलमध्ये 54 रनवर नाबाद आणि सूर्यकुमार यादव 19 बॉलमध्ये 25 रनवर नाबाद राहिला. रोहित शर्मा 37 बॉलमध्ये 56 रन करून आऊट झाला. या सामन्यात टीम इंडियाने नामिबियाला 132 रनवर रोखलं. आर.अश्विन आणि रविंद्र जडेजा यांना प्रत्येकी 3-3 विकेट मिळाल्या, तर जसप्रीत बुमराहला दोन विकेट घेण्यात यश आलं. नामिबियाकडून डेव्हिड वीजने सर्वाधिक 26 रन केले. ओपनर स्टीफन बार्ड 21 रन करून आऊट झाला. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. विराट कोहलीचा टी-20 कॅप्टन म्हणून हा अखेरचा सामना होता. या टी-20 वर्ल्ड कपमधलं टीम इंडियाचं आव्हान आधीच संपुष्टात आलं होतं. सुपर-12 मधली भारताची ही अखेरची मॅच होती. या स्पर्धेमध्ये टॉसनेही टीम इंडियाचा घात केला. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने टॉस गमावला, ज्याचा फटका टीमला बसला. नामिबियाविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियात एक बदल करण्यात आला आहे. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीऐवजी लेग स्पिनर राहुल चहरला संधी देण्यात आली. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध दारूण पराभव झाल्यानंतर भारताने नामिबिया, अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडवर दणदणीत विजय मिळवला. यानंतर सेमी फायनलला (T20 World Cup Semi Final) पोहचण्यासाठी टीम इंडियाचं भवितव्य रविवारी झालेल्या अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड (Afghanistan vs New Zealand) यांच्यातल्या सामन्यावर अवलंबून होतं. या सामन्यात अफगाणिस्तानचा विजय झाला असता तर भारतासाठी सेमी फायनलचे दरवाजे उघडले असते, पण न्यूझीलंडने अफगाणिस्तानला पराभूत करत सेमी फायनल गाठली आणि भारताच्या स्वप्नांचा चुराडा झाला. टी-20 वर्ल्ड कप सुरू व्हायच्या आधीच विराट कोहलीने आपण या फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं. विराटसोबतच टीम इंडियाचे मुख्य कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचाही हा अखेरचा सामना आहे. रवी शास्त्री यांचा कार्यकाळही टी-20 वर्ल्ड कपनंतर संपणार आहे. विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्या जोडीला एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात यश आलं नाही. रवी शास्त्री यांच्यानंतर राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होणार आहेत.
  Published by:Shreyas
  First published: